मुंबई: गरजूंना मदत करणारा अभिनेता सोनू सूदला नुसतंच एका तरुणीनं आयफोनची मागणी केली होती. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमीनं देखील सोनू सूदकडे अजब मागणी केली आहे. याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक गरजूंना सोनू सूदनं मदतीचा हात दिला. त्यानंतर देवमाणूस सोनू सूदकडे आपल्या व्यथा मांडताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. याच दरम्यान एका क्रिकेटप्रेमीनं सोनू सूदकडे जी मागणी केली ती वाचून एक क्षण तुम्हालाही हसावं की रडावं असं वाटेल. मात्र सोनूनं या क्रिकेटप्रेमीलाही खूपच भारी उत्तर दिल्यानं आता त्याची चर्चा होत आहे. 




क्रिकेटप्रेमीनं म्हटलं की सोनू सोदू प्लीज केन विल्यमसनला तंबुत पाठव ना! त्यावर सोनूनं रिप्लाय देत म्हटलं की टीम इंडियात असा एक खेळाडू आधीच आहे. पाहिलं का जो विल्यमसनला तंबुत पाठवेलं.


भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं जबरदस्त कमालीची खेळी केली आहे. त्याने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेऊन किवीच्या फलंदाजांना गारद केलं. त्याच्या बॉलिंगपुढे 4 दिग्गज फलंदाजांना नमतं घ्यावं लागलं. मोहम्मद शमीनं कोलिन, रॉस टेलर, बीजे वाटलिंग, काइल जेमीसन अशा तरबेज फलंदाजांची विकेट काढून महत्त्वाची भूमिका बजावली.