मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी साउथेम्प्टनमध्ये पोहोचले असून तिथे आयसोलेशनमध्ये आहेत. आयसोलेशनमध्ये असताना तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टा स्टेटसला ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुरू केली आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपला सराव सुरू केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना कडक आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. एकमेकांना तीन दिवस भेटण्याची परवानगी देखील नाही. अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूंना ग्राऊंडवर धावण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र ती देखील प्रत्येक खेळाडूला वेगवेगळी वेळ देण्यात आली आहे. 



स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने ग्राऊंडवर धावताना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रशिक्षणासाठी टीम इंडियाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांना न भेटता आपलं स्वतंत्र सध्या सराव करू शकतात. खेळाडूंचा क्वारंटाइन काळ संपल्यानंतर टीममधील सर्वजण एकत्र मिळून सराव करू शकतात.


टीम इंडियाला 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना ड्युक बॉलने न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंड विरुद्ध खेळली जाणार आहे.