मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्या दरम्यान मोहम्मद शमीचा जलवा पाहायला मिळाला आहे. मोहम्मद शमीनं आपल्या मास्टरप्लॅननुसार किवीच्या फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवलं. बरोबर त्याला आऊट केलं आहे. शमीच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किवी संघातील सर्वोत्तम फलंदाज कोलिन डी ग्रँडहोम याची विकेट पाहण्यासारखी होती. शमीने त्याला चकवा देऊन अशी जबरदस्त विकेट काढली की कोलिनही एक क्षण चक्रावला. कोलिनला शमीनं LBW आऊट केलं आणि तो आऊट होताच मैदानात टीम इंडियाने जल्लोष साजरा केला. 


बॉल केव्हा आपल्या पॅडला लागला हे कोलिनला समजलंही नाही. इतक्या सफाइदारपणे शमीने त्याला आऊट केलं. त्याच्या या कौशल्याचं कौतुक सर्वांकडून होत आहे. 



इंग्लंडच्या मैदानात पुन्हा एकदा शमीनं 22 जूनला धुमाकूळ घातला. आपल्या नावावर त्याने 4 विकेट्स केल्या आहेत. कोलिननं 30 चेंडूमध्ये 1 चौकार ठोकला आणि 13 धावा काढल्या. रॉस टेलर, बीजे वाटलिंग, काइल जेमीसन असा तरबेज फलंदाजांची विकेट काढून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 


 


भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. या अंतिम सामन्यात पाचव्या दिवस अखेरपर्यंत टीम इंडियाने एकूण 281 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात 317 तर दुसऱ्या डावात 64 धावा करून 2 गडी बाद झाले आहेत. तर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 249 धावा केल्या आहेत. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्या दिवशी पावसानं धुमाकूळ घातल्यानं खेळ झालाच नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मिळून टीम इंडियाने 217 धावा केल्या. तिसऱ्या आणि चौथ्या दिवस अखेर न्यूझीलंड संघाने 249 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 64 धावा केल्या आहेत. आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.