WTC Final 2023 Date, Time, Venue And Live Telecast: क्रिसचर्चमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंकेदरम्यानच्या कसोटी सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडने विजय (Sri Lanka lose to New Zealand) मिळवत भारताला अनोखी भेट दिली. श्रीलंका या सामन्यात पराभूत झाल्याने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 साठी (WTC Final 2023) पात्र ठरला आहे. भारतीय संघ (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये बॉर्डर-गावस्कर कसोटी चषकाचा अंतिम सामना खेळत हा. सामना अनिर्णित राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. असं झालं तरी ही मालिका भारत 2-1 ने जिंकेल. त्यामुळेच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 साठी (World Test Championship) पात्र ठरला असून आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 4 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेलं टेस्ट क्रिकेटमधील बादशाह बनणण्याचं स्वप्न साकारण्यासाठी मैदानात उतरले. मात्र हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार आहे याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात...


कोणीही जिंकलं तरी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलच्या माध्यमातून खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा सामना 7 जून रोज खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील किंग्सटन येथील ओव्हर मैदानात खेळवला जाणार आहे. 20 वर्षानंतर पहिल्यांदाच या सामन्याच्या माध्यमातून भारतीय आणि ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. विशेष म्हणजे हा सामना जिंकणारा संघ आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने यापूर्वी एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे.



कधी खेळवला जाणार हा सामना?


हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. 12 तारखेचा दिवस हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आलेला आहे. या स्पर्धेचे पहिले पर्व न्यूझीलंडने जिंकले. यावेळी त्यांनी भारताला पराभूत केलं होतं.


किती वाजता खेळवला जाणार सामना?


भारतीय वेळेनुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा सामना दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत रोज सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना डे-नाईट वाटत असला तरी इंग्लंडच्या वेळेनुसार हा सामना सकाळीच खेळवला जाणार आहे.



कुठे पाहता येणार हा सामना?


भारतामध्ये स्टार नेटवर्कवरुन हा सामना लाइव्ह प्रेक्षकांना लाइव्ह पाहता येणार आहे. हा सामना 'स्टार स्पोर्ट्स वन', 'स्टार स्पोर्ट्स वन एचडी', 'स्टार स्पोर्ट्स वन हिंदी', 'स्टार स्पोर्ट्स वन हिंदी एचडी', 'स्टार स्पोर्ट्स वन तमीळ', 'स्टार स्पोर्ट्स वन तेलगू', 'स्टार स्पोर्ट्स वन कन्नडा' या वाहिन्यांवर पाहात येणार आहे.


ऑनलाइन कुठे पाहता येणार सामना?


'स्टार'च्या मालकीच्या डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर सामना लाइव्ह पाहता येणार आहे. तसेच आयसीसीच्या वेबसाईट आणि अॅपवर सामन्यासंदर्भातील अपेडट पाहता येतील. तसेच झी24 तासच्या वेबसाईटवर या सामन्यासंदर्भातील सर्व बातम्या पाहता येतील.