WTC Final 2023: दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!
IND vs AUS WTC Final: ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी (Team India) सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
WTC Final Ind vs Aus: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना (ICC WTC Final 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळवला जाणार आहे. येत्या 7 जूनपासून दोन्ही संघ इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर भिडणार आहेत. त्यामुळे आता कमालाची उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच आयपीएल संपल्याने सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी धमाका केला. आयपीएलच्या जोरदार कामगिरीने काही खेळाडूंनी टीम इंडियाच्या (Team India) स्थान देखील मिळवलंय. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकणं दिसतंय तेवढं सोपं नाही.
ओव्हलच्या मैदानावर तगड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं टीम इंडियासाठी सोपं असणार नाही. मागील 12 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे आता टीम इंडियाला कसोटी वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, ओव्हल वरचे रेकॉर्ड घाबरवणारे नक्कीच आहेत. टीम इंडियाने आत्तापर्यंत ओव्हलवर 14 सामने खेळले आहेत. त्यामध्ये फक्त 2 सामने भारताला जिंकला आले आहेत. तर 5 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्याचबरोबर 7 वेळा सामने अनिर्णित राहिलेत.
आणखी वाचा - IND vs AUS : ड्यूक की कुकाबुरा? WTC Final मध्ये 'या' बॉलचा होणार वापर!
एवढंच नाही तर कसोटीमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड देखील खास राहिला नाही. दोन्ही संघ आत्तापर्यंत 106 वेळा आमने सामने आलेत, त्यातील फक्त 32 सामने भारताच्या पारड्यात पडलेत. तर 44 सामने ऑस्ट्रेलियाने खिशात घातले आहेत. दोन्ही संघात खेळण्यात आलेले 29 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे आता महत्त्वाच्या सामन्यात कोण जिंकणार? असा सवाल आता विचारला जातोय.
टीम इंडिया (Team India On Oval) :
14 टेस्ट, 2 विजय, 5 पराभव, 7 ड्रॉ
ऑस्ट्रेलिया (Australia On Oval) :
38 टेस्ट, 7 विजय, 17 पराभव, 14 ड्रॉ
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी (Ind vs Aus Head to Head)
इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकूण सामने : 106
ऑस्ट्रेलिया : 44
टीम इंडिया : 32
ड्रॉ सामने : 29
ड्रॉ: 01
दरम्यान, टीम इंडियामध्ये यावेळी शुभमन गिल (Shubhman Gill) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर टीम इंडियाचा किंग विराट कोहली (Virat kohli) देखील चांगली कामगिरी करून दाखवतोय. तर चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर संघाची भिस्त असेल. तर फिरकीच्या जाळ्यात फसवण्यासाठी रविंद्र जडेजा, आर आश्विन आणि अक्षर पटेल यांचं त्रिकूट रोहितने आखलंय. त्यामुळे आता टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप (Test World Cup) काबीज करणार, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.
WTC साठी दोन्ही संघ
टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया -
पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश इंगलिस (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, जोश हेजलवुड, नाथन लियोन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क.