साऊथेम्पटन : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जातोय. पाचव्या दिवशी भारतीय टीम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरली. भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या दिवसाची पहिली ओव्हर टाकण्यास सज्ज झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराहकडून झाली मोठी गडबड
पण, सर्वांच्या नजरा बुमराहच्या टी-शर्टवर गेल्या. बुमराहकडून एक चूक झाली होती. बुमरहाने WTC अंतिम सामन्यासाठीचं टी-शर्ट घालण्याऐवजी टीमचं जुनं टी-शर्ट घातलं होतं. याच टी-शर्टवर त्याने पहिली ओव्हरही टाकली. पण ओव्हर संपल्या-संपल्या त्याने तात्काळ मैदान सोडलं आणि ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली. 


बुमराहचा फोटो होतोय व्हायरल
जुन्या टी-शर्टवरचा बुमराहचा फोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीममधल्या खेळाडूंना ठराविक टी-शर्ट देण्यात आलं आहे. एखाद्या खेळाडूकडून अशी चूक होणं क्वचितच घडतं. त्यामुळे बुमराहच्या या चुकीवर चांगलीच चर्चा रंगली आहे.