रोहित किंवा हार्दिक पांड्या नाही तर `हा` टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन
रोहित किंवा हार्दिक पांड्या नाही तर `हा` टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन
मुंबई : टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण अशी एक चर्चा सध्या होत आहे. रोहित शर्मानंतर कर्णधारपद संभाळण्याची क्षमता कोणाची आहे यावर सध्या चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्याचं नाव समोर आलं होतं. मात्र रोहित आणि हार्दिक नाही तर खास खेळाडूच्या नावाची शिफारस होणार असल्याची चर्चा आहे.
डब्ल्यूवी रमन यांनी तर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असेल याचं भाकीत वर्तवलं आहे. महेंद्रसिंहचा चेला पुढचा कर्णधार होणार आहे. ऋषभ पंतकडे टीम इंडियाची कमान दिली जाऊ शकते.
पंत गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या किपिंग आणि फिटनेसवर खूप काम करत आहे. त्याचा फायदा देखील दिसत आहे. पुढच्या काळात पंत टीम इंडियाचा कर्णधार असेल असा विश्वास डब्ल्यूवी रमन यांनी व्यक्त केला.
पंतला अजूनही फलंदाजीमध्ये सुधारण्याचा वाव आहे. पंत वेळ न घेता आक्रमकपणे खेळतो त्यामुळे तो कधीकधी मार खातो. मात्र त्याने त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.
टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याही पुढचा कर्णधारपदाचा दावेदार मानला जात आहे. आयपीएलमध्ये पांड्याने उत्तम कामगिरी केली. गुजरात टीमला मिळालेलं यश पाहता त्याचं नाव चर्चेत आहे.