डर्बी : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध करो वा मरोची स्थिती असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपमध्ये भारताने पहिले चार सामने जिंकले. त्यानंतर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभव सहन करावा लागल्याने भारताचा आत्मविश्वास कमी झालाय. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.


पॉईंटटेबलमध्ये ८ गुणांसह भारत चौथ्या स्थानी आहे. भारताने ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय तर दोन सामन्यांत पराभव झालाय.


दुसरीकडे न्यूझीलंडलाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. त्याचे एकूण ७ पॉईंट आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी तेही उत्सुक आहेत.