मुंबई : ‘डेडमॅन’या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अंडरटेकरने WWE मधून कायमस्वरुपी निवृत्ती घेतली आहे. तो आता पुन्हा कधीच WWE रिंगमध्ये फायटिंग करताना दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अत्यंत दुःख झालं आहे. जवळपास ३३ वर्ष WWEच्या रिंगमध्ये राज्य करणाऱ्या अंडरटेकरने अखेर प्रोफेशनल रेसलिंगमधून निवृत्ती घेतली आहे. ३ दशकं रेसलिंग क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या अंडरटेरने आपल्या निवृत्तीची घोषणा करताच सोशल मीडियावर #ThankyouTaker ट्रेंड होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द अंडरटेकरने त्याच्या निवृत्तीची बातमी दिली. १९९० च्या दशकात अंडरटेकरने WWEमध्ये पदार्पण केले होते. वाढत्या वयामुळे तो आता फायटिंग करू शकत नाही. त्याची ताकत देखील कमी झाली आहे. तो आता ५५ वर्षांचा आहे. 




सध्या सोशल मीडियावर त्याचे चाहते दुःख व्यक्त करताना दिसत आहे. अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. भारतात देखील त्याचे असंख्य चाहते आहेत.