नवी दिल्ली : अगदी अनपेक्षीतपणे रेसलमेनिया ३३ जिंकत स्मॅकडाऊनव डेब्यू करणारा नाकामुरा सध्या भलताच चर्चेत आहे. रेसलमेनियातील विजयानंतर त्याने आपल्या पुढील लढतीबाबत भाष्य केले आहे. तो म्हणतो आपल्या चाहत्यांच्या आग्रहास्तव आपण ब्रॉक लेसनरऐवजी एजे स्टाईलला आव्हान देणार आहोत. पुढचा सामना आपण एजेसोबतच लढू.


एजे स्टाईल आणि लेस्नर विरूद्ध लढण्याची संधी. पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनपेक्षीत आणि तितकीच आश्चर्यकारक खेळी करत नाकामुराने रेसलमेनिया ३३ मध्ये रोमन रेंसला रिंगबाहेर फेकले आणि टायटल जिंकले. त्यामुळे या विजयानंतर त्याला युनिव्हर्सल चॅम्पीयन ब्रॉक लेस्नर आणि WWE चॅम्पीयन एजे स्टाईल याच्याविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली.


नाकामुराने केली एजे स्टाईलची निवड


दरम्यान, रेसलमेनिया ३३ जिंकल्यावर नाकामुराने तक्काळ जाहीर करून टाकले की, आपण WWE युनिव्हर्सल चॅम्पीयन ब्रोक लेस्नर याच्याऐवजी  WWE चॅम्पीयन एजे स्टाईल्स याच्याविरूद्ध चॅम्पीयनशिपचा सामना लढू. तो म्हणाला की, माझ्याकडे लेस्नर आणि एजे स्टाईल अशा दोघांसोबतही लढण्याचा पुरता अनुभव आहे. मला ब्रॉक लेस्नरला निवडता आले असते. पण, माझे चाहते आणि संपूर्ण दुनिया जानते की, माझा सामना एजे स्टाईल्ससोबत झाला पाहिजे.