Yashasvi Jaiswal On Virat Kohli : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या इंदोरच्या होळकर मैदानावर टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने 34 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली. तर शिवम दुबे याने 32 बॉलमध्ये 63 धावा फटकावल्या होत्या. रोहित आणि विराट फेल गेल्यानंतर दोन्ही युवा खेळाडूंनी संयमी खेळी केल्याने टीम इंडियाचा विजय सोपा झाला होता. अशातच आता मालिका खिशात घातल्यानंतर आता सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने माध्यमांशी बोलताना तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Yashasvi Jaiswal ?


मी चांगली सुरुवात केली त्यामुळे मी बराच वेळ मैदानात टिकून राहून फलंदाजीचा प्रयत्न करत होतो. मी माझा स्ट्राइक रेट कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी चांगल्या स्ट्राइक रेटवर धावा करण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. वाईट पडणाऱ्या बॉलवर मी धावा कुटण्याच्या प्रयत्न करत होतो आणि आक्रमक सुरूवात करून दिली. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) म्हणाला आहे.


मी सराव सत्रात खूप मेहनत करतो. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि जो संघ सर्वात महत्त्वाचा आहे त्या संघासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देऊ शकतो. जेव्हाही मी विराट भैय्यासोबत फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो. विराटसोबत खेळल्याने मला अनेक गोष्टी समजतात. आपल्याला कुठं बॉल मारायला पाहिजे, याची गणित मला समजतं, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal On Virat Kohli) याने म्हटलं आहे.



कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो...


सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली. खासकरून तरुण पोरांनी जोश दाखवला अन् सामना खेचला. शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक फलंदाजी करून आम्हाला विजयाचा रस्ता दाखवला. यशस्वी जयस्वाला आता नवा स्टार म्हणून समोर येतोय. तो एकीकडे टेस्ट मॅच देखील खेळतो अन् आता तो टी-ट्वेंटी देखील खेळतो. त्याला त्याच्या क्षमता माहिती आहेत आणि तो त्याचा उपयोग करतो, असं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.