Lesbian Women Cricketer: इंग्लंडच्या महिला संघातील माजी क्रिकेटपटू सारा टेलरने (Sarah Taylor) तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे साराने आपण समलैंगिक असून माझी पार्टनर डियाना गर्भवती (Pregnancy) असल्याचं तीन फोटो पोस्ट करत जाहीर केलं आहे. डियाना 19 आठवड्यांनंतर बाळाला जन्म देणार आहे. 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास जाहीर करणारी विकेटकीपर-फलंदाजया घोषणेमुळे पुन्हा चर्चेत आहे. "हा प्रवास सोपा नव्हता. मात्र मी याचा एक अविभाज्य भाग आहे ही आनंदाची बाब आहे," अशा कॅप्शनसहीत साराने तिच्या पार्टनरबरोबरचा प्रेग्नसी कीटसहीतचा फोटो पोस्ट केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलक्रिस्टने पोस्टवर कमेंट करुन तिचं अभिनंदन केलं आहे.



मानसिक आजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम विकेटकिपर्सपैकी एक असलेल्या साराने सप्टेंबर 2019 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. साराने मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे मार्च 2016 पासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर तिने विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2017 मध्ये विश्वचषक स्पर्धेमध्ये 49.50 च्या सरासरीने 396 धावा केल्या होत्या. साराने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 147 धावांची खेळी केली होती. सेमीफायनलमध्ये 54 धावा तर भारताविरुद्ध 45 धावांची खेळी साराने केली होती.


केवळ पडून राहायचे आणि श्वास घ्यायचे


मानसिक आरोग्यासंदर्भात बोलताना साराने, "तुम्ही फार नकारात्मक आहात. सर्वकाही वाईट घडत आहे. मला नीट श्वास घेता येत नसल्याने मला पॅनिक अटॅक येणार. मी पूर्ण दिवस श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करते. तेव्हा मी विचार करायची की 'मी माझ्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहे?' मी दिवस दिवस झोपून असायचे. केवळ श्वास मोजत पडून असायचे," असं सांगितलं होतं. 


सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक


लंडनमध्ये जन्म झालेली सारा ही तीन विश्वविजेत्या महिला संघांमध्ये होते. तिने 2009 मध्ये आणि 2017 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघात मोलाचं योगदान दिलं होतं. तर 2009 साली वनडेचा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही ती भाग होती. तिने एकूण 226 सामने इंग्लंडच्या संघाकडून खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारी ती महिला खेळाडू आहे. तिने 126 सामन्यांमध्ये 38.26 च्या सरासरीने 4056 धावा केल्या. यामध्ये 20 अर्धशतकं आणि 7 शतकांचा समावेश आहे.