Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गिलची बॅट फेल गेलेली दिसली. गिल कधी त्याच्या खेळाच्या जोरावर तर कधी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. शुभमन गिल ( Shubman Gill ) चं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) शी जोडण्यात येतं. अशातच आता शुभमनने अखेर तो कमिटेड असल्याचं कबूल केलं. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलच्या या इन्स्टाग्राम पोस्टने एक मोठी खबबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा होती. तर दुसरीकडे सारा अली खानसोबत त्याचं अफेअर असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र आता शुभमन गिल ( Shubman Gill ) ने स्वतःच तो कमिटेड असल्याचं म्हटलंय. त्याच्या या पोस्टने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


शुभमनने अंगठीसोबत केला फोटो अपलोड


गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा रंगत होत्या. अखेर यावर आता शुभमनने उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर शुभमनने एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये त्याच्या हातात अंगठी दिसून येतेय. या फोटोला कॅप्शन देताना YES, I’m committed! असं म्हटलंय. 



दरम्यान त्याच्या पोस्टनंतर सर्वांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केल्या. मात्र यानंतर शुभमनने हा फोटो पुन्हा शेअर केला आणि त्यामध्ये त्याने Paid partnership असं लिहलं. त्यामुळे शुभमनच्या हातात असलेली अंगठी एखाद्या एडचं प्रमोशन असण्याची शक्यता आहे.