पार्ल : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात भारताकडून विराट कोहली, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर या सर्वांनी खराब फलंदाजी केली. तर सामन्यानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका त्यांच्या घरच्या मैदानावर खूप चांगलं खेळ करतेय. आम्ही मध्ये चुका करतोय. मात्र सलग दोन सामने हरणं चांगलं नाही, असं कर्णधार केएल राहुल म्हणाला.


राहुल म्हणाला, आम्ही गोष्टी चांगल्या केल्या नाहीत त्यांना सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मी यापूर्वीही पार्टनशिपबद्दल बोललो होतो. मोठ्या स्पर्धेत जाण्यासाठी मिडल ऑर्डरच्या फलंदाजी महत्त्वाची असते.


केएल पुढे म्हणाला, आम्हाला दबाव निर्माण करायचा आहे. मला वाटत नाही की, ही अशी खेळपट्टी होती जिथे ते सहज 280 धावांचा पाठलाग करण शक्य आहे. पण श्रेय त्यांना जाते, त्यांनी चांगली फलंदाजी केली. 


शार्दूल ठाकूरचं कौतुक


शार्दुल सेवटी येऊन चांगली फलंदाजी करत आहे. तो आम्हाला दाखूवन देतो की तो देखील फलंदाजी करू शकतो. जसप्रीत बुमराह नक्कीच उत्तम गोलंदाज आहे. तो टीमचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कायम राहील.


आम्ही बऱ्याच दिवसांपासून 50 ओव्हरचे सामने खेळलो नाही. आम्ही येणाऱ्या तिसर्‍या सामन्यासाठी तयारी करतोय. या सामन्यात आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. यावेळी काही बदल होऊ शकतात.