मुंबई : दिवसेंदिवस आता सोशल मीडियात देखील अनेक बदल होत आहे. सोशल मीडियाचा वापर सुरूवातीला फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी केला जात होता. पण आता त्याचाच वापर पैसे कमावण्यासाठी देखील केला जातो. अनेक कंपन्या आपल्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी कलाकारांचे आणि खेळाडूंच्या सोशल मीडियावरील पोस्टची मदत घेत असतात. या बदल्यात या कलकारांना मोठी रक्कम दिली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्राम पोस्ट शेड्यल करणाऱ्या प्लॅटफॉर्म Hopper HQ ने 2018 च्या इंस्टाग्राम पोस्टवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची आणि खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने इंस्टाग्राम स्पोर्ट्स रिच लिस्टमध्ये नववे स्थान पटकावले आहे. तसेच ओवर ऑल या लिस्टमध्ये विराट कोहलीने 17 वे स्थान कमावले आहे. 


इंस्टाग्रामच्या शेड्यूलिंग टूल HopperHQ.com च्या सूचीनुसार, कोहली ज्याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 23.2 मिलियन म्हणजे 2,32,12,898 एवढे आहेत. विराट कोहली आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टवरून 1,20,000 अमेरिकी डॉवर म्हणजे 81 लाख रुपये कमवत असतो. विराट कोहलीने अमेरिकेतील बास्केटबॉल सुपरस्टार स्टीफन करी आणि सेवा निवृत्त मुक्केबाज फ्लॉयड मेवेदार यांना देखील मागे टाकलं आहे. या यादीत फुटबॉलचे मेगास्टार पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो सर्वात वरच्या यादीवर आहे. तर ब्राझिलचा फुटबॉलर नेमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी अर्जेंटीनाचा लियोनेल मेसी तिसऱ्या स्थानावर आहे. 


पाहा इंस्टाग्राम SPORTS रिच लिस्ट 


1. क्रिस्टियानो रोनाल्डो, 136 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत - USD 750,000 (जवळपास 5.16 करोड रुपये)


2. नेमार, 100 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 600,000


3. लियोनेल मेसी, 97.2 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 500,000


4. डेविड बेकहम, 49.7 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 300,000


5. गेरेथ बेल, 35.4 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 185,000


6. ज्लाटन इब्राहिमोविच, 34.5 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 175,000


7. लुईस सुआरेज, 29.2 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 150,000


8. कॉनर मैक्ग्रेगर, 24.5 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 125,000


9. विराट कोहली, 23.2 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 120,000 (लगभग 83 लाख रुपये)


10. स्टीफन करी, 21.3 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 110,000


11. फ्लॉयड मेवेदर, 20.8 मिलियन फॉलोअर्स, एका पोस्टची किंमत- USD 107,000