मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेल्या क्रिकेटर युसुफ पठाणच्या स्थानिक क्रिकेटसह टीम इंडियात परतण्याच्या आशांना मोठा झटका बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटर युसुफ पठाण गेल्या वर्षी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरलाय. टेस्टमध्ये दोषी ठरल्याने बीसीसीआयकडून पाच महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आलंय. मात्र या निलंबनानंतर युसुफ पठाणची सगळ्यात मोठी चिंता मिटलीये.


युसुफ पठाणचे नाव या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयपीएल लिलावात सामील करण्यात आलेय. युसुफ पठाणने बडोदा रणजी टीमकडून केवळ एक सामना खेळला होता.


युसुफने ब्रोजिट नावाच्या औषधाचे सेवन केले होते. या औषधात प्रतिबंधित पदार्थाचा समावेश केला जातो. कोणत्याही खेळाडूला हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र हे औषध घेण्यासाठी पठाणने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. दरम्यान, गेल्या वर्षी डोपिंग टेस्टमध्ये पठाण दोषी आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये.