नवी दिल्ली: आशिष नेहराने न्यूझीलंडविरूद्ध आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत क्रिकेटला अलविदा केले. खेळाडू, स्टेडिअममधील प्रेक्षक तसेच सोशल मीडियावरही त्याचे कोतूक केले जात आहे. अशाच आशयाचा भावपूर्ण संदेश युवराज सिंगने फेसबूकवर लिहिला आहे. एक सच्चा दोस्त आणि प्रेरणास्त्रोत अशा शब्दात युवराजने नेहराचे कौतूक केले.


स्वच्छ मनाचा माणूस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहराजी स्वच्छ मनाचा माणूस असल्याचे युवराज याने सांगितले. तो नेहमी खरे बोलतो याचे परिणामही त्याला भोगावे लागत आहेत. सांघिक भावना त्याच्यामध्ये खच्चून भरली आहे.  भारताच्या अंडर १९ संघात निवड झाल्यानंतर त्याच्याशी भेट झाल्याचे युवराज सांगतो. त्यावेळी हरभजनचा तो रुममेट असल्याने भज्जीला भेटायला गेलो असता उंच असा हा खेळाडू दिसला जो एका जागेवर स्वस्त बसत नव्हता. 


वारंवार दुखापतग्रस्त होऊनही वयाच्या ३८ व्या वर्षी तो फास्ट बॉलिंग करु शकतो. पण मी ३६ व्या वर्षात त्यातुलनेत बॅटिंग करु शकत नाही असे युवराज सांगतो. कॅन्सरवर मात करुन पुनरागम करणारा युवराज म्हणतो, आशूचे ११ ऑपरेशन झाले तरीही मेहनत आणि चांगल्या खेळामूळे त्याने संघात स्थान मिळविले. 
२००३ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पायाच्या दुखापतीमूळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात  तो खेळू शकत नव्हता. पण त्याला खेळायचेच होते. ७२ तासात ३०-४० वेळा बर्फ शेकवून , पेन किलर खावून त्याने खेळ पूर्ण केला. 



भावनिक क्षण


वर्ल्ड कप २०११ मध्ये उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी केली, पण जखमी झाल्याने तो अंतिम सामना खेळू शकला नाही. अशा वेळी अनेक खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होते पण नेहरा नेहमी हसत हसत सर्वाला सामोरा जात असतो. 
छान दिसते. माझ्यासाठी तस्च त्यांच्या कुटुंबासाठी हा एक भावनिक क्षण आहे. हा मित्र दिल्याने मी क्रिकेटचा नेहमी आभारी राहिन असेही युवराजने लिहिले आहे.