मुंबई : आयपीएल 2018 च्या 11 व्या सीजनमधील 34 व्या सामन्यात मुंबईने पंजाबचा पराभव केला. आधी फलंदाजी करत पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 174 रन केले. पंजाबकडून सर्वाधिक 50 रन गेलने केले. 175 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत मुंबईकडून एक ओव्हर बाकी ठेवत 6 विकेट ठेवत मुंबईने विजय मिळवला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 57, ईशान किशनने 25, हार्दिकने 23, कृणाल 31 रन तर रोहितने 15 बॉलमध्ये 24 रन केले. सूर्यकुमारच्या 57 रनच्या तूफानी खेळीमुळे तो मॅन ऑफ द मॅच ठरला. पण जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा असं काही झालं जे पाहून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.


कृणाल पांड्या आणि रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर सर्व खेळाडूंसोबत हात मिळवला. पण जेव्हा कर्णधार रोहित शर्मा युवराज सिंगकडे गेला तेव्हा युवीने रोहित सोबत असं काही केलं ज्यामुळे सगळेच त्यांच्याकडे पाहात राहिले. युवराजने आधी रोहत की कॉलर पकडली, मग गळा धरला त्यानंतर पाठीवर शाबासकी देत त्याचं कौतूक केलं. या वेगळ्या अंदाजाची सध्या चर्चा आहे. याआधी देखील युवी वेगळ्या अंदाजामध्ये पाहिला गेला आहे. कधी तो खेळाडूंना उचलून घेतो तर कधी तो डान्स करतो.