ICC World Cup 2023 India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायवोल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. शुभमनला डेंग्यू (Dengue) झाल्याची माहिती समोर आली होती. 2 दिवसांपूर्वी शुभमनला चेन्नईच्या रूग्णालयात देखील दाखल केलं गेलं होतं. त्यानंतर त्याला लगेच डिस्चार्ज देण्यात आलाय. अशातच आता शुभमन गिलचा गुरू आणि टीम इंडियाचा माजी स्टार वर्ल्ड कपविजेता ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) याने शुभमनचा जोश हाय केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल पंजाबमध्ये युवराजच्या तालमीत वाढला. त्याने तगडं प्रशिक्षण देखील घेतलं. आयपीएल गाजवली अन् आता त्याला वर्ल्ड कपमध्ये देखील संधी मिळालीये. अशातच वर्ल्ड कपच्या आधीच त्याला डेंग्यू झाल्याची माहिती मिळाली अन् टीम इंडियाला मोठा धक्का बसला. आजारातून उठून शुभमन गिल खेळणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, शुभमन गिलच्या मदतीला युवराज सिंह धावून गेलाय. युवराजने शुभमनच्या जोश वाढवण्यासाठी त्याला आपल्या कॅन्सरच्या (Yuvraj Singh Cancer) फाईटचा किस्सा सांगितला अन् त्याला तयार करण्याचं काम केलंय. युवराज सिंहच्या भाषेत सांगायचं गेलं तर युवीने शुभमनची कानउघडणी केली आहे.


काय म्हणाला Yuvraj Singh ?


कॅन्सरशी झुंज देताना मी विश्वचषक खेळलो होतो, कॅन्सर असताना देखील मी संघात येण्यासाठी पटकन तयार झालो, असं मी शुभमनला सांगितलं. त्याला मी तगडा केलंय. मला आशा आहे की, तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तयार असेल. जेव्हा तुम्हाला ताप आणि डेंग्यू असतो तेव्हा क्रिकेट सामना खेळणं खरोखर कठीण असतं आणि मी ते अनुभवलं आहे. त्यामुळे मला आशा आहे की तो तंदुरुस्त असेल तर तो नक्कीच खेळेल, असा विश्वास युवराज सिंहने (Yuvraj Singh On Shubhman Gill) व्यक्त केला आहे.


आणखी वाचा - IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video


दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात आशिया कपमध्ये झालेल्या सामन्यात शुभमन गिल आणि रोहित शर्माने तगडी सलामी दिली होती. त्यामुळे शुमभनची खेळणार नसेल तर त्याची कमतरता नक्की दिसून येईल. शुभमन खेळणार नसेल तर ईशान किशन सलामीला असेल, हे मात्र निश्चित...