Yuvraj Singh Shocking Revelation About His Father Yograj: भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी फलंदाज युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर योगराज यांनी टीका केली आहे. केवळ धोनीच नाही तर भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कपील देव यांच्याबद्दलही योगराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मात्र योगराज सिंग चर्चेत असतानाच आता युवराजचा एका व्हिडीओ समोर आला असून त्याने वडिलांबद्दल एक धक्कदायक खुलासा केला आहे. 


योगराज धोनीबद्दल काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा योगराज यांनी जाहीरपणे धोनीवर टीका केली आहे. नुकत्याच केलेल्या विधानामध्ये त्यांनी धोनीने आपल्या मुलाचं म्हणजे युवराजचं करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे. "मी धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने आपला चेहरा आरशात पाहावा. तो मोठा क्रिकेटर असेल पण त्याने माझ्या मुलाविरोधात जे काही केलं ते सगळं आता बाहेर येत आहे. मी कधीच त्याला माफ करु शकणार नाही. माझ्यासोबत जो चुकीचं वागतो त्याला मी कधीच माफ करत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे मी आयुष्यात कधीच अशा लोकांना मिठी मारत नाही. मग ती माझी मुलं असो किंवा कुटुंबातील सदस्य असोत, मी अशा लोकांना मिठी मारत नाही" असं योगराज सिंग यांनी 'झी स्विच' या युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हटलं.


कपिल देवबद्दल वादग्रस्त विधान


"योगराज सिंग कोण आहे हे मी जगाला दाखवू इच्छितो. ज्याला तुम्ही खाली खेचले आज संपूर्ण जग त्याच्या पायाखाली आहे. सगळं जग त्याला सलाम करते. ज्यांनी माझं वाईट चिंतलं त्यापैकी काहींना कॅन्सर आहे. काहींचं घर तुटलं. तर कोणाचं निधान झालं आहे. काहींच्या घरी मुलगाच जन्माला आला नाही. तुम्ही समजू शकता मी कोणाबद्दल बोलतोय. ज्या माणसाने हे सगळं केलं ते ग्रेटेस्ट कॅप्टन ऑफ ऑल टाइम कपिल देव आहेत. मी त्याला म्हटलं होतं की, तुझे असे हाल करून सोडेन की संपूर्ण जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराज सिंगकडे 13 ट्रॉफी आहेत तर कपिल देवकडे फक्त एक वर्ल्ड कप आहे," असं विधान योगराज सिंग यांनी केलं.


युवराजचा धक्कादायक खुलासा


योगराज यांच्या या विधानानंतर आता सोशल मीडियावर युवराजचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये युवराज त्याच्या वडिलांबद्दल बोलताना दिसत आहे. "मला वाटतं की माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे आणि ते हे मान्य करायला तयार नाहीत,' असं युवराज म्हणाला. त्यावर रणवीर अल्लाहबादियाने आपल्या दोघांचंही सारखच असून दोघांच्या वडिलांनी आयुष्यात यश मिळवलं आहे असं म्हटलं. यावर युवराजने हो असं उत्तर देत, "मात्र मला असं वाटतं की त्यांनी या समस्येवर काहीतरी केलं पाहिजे. मात्र ते हे (समस्या आहे ही गोष्ट) मान्यच करायला तयार नाहीत," असं म्हटलं. 



योगराज यांनी केलेल्या विधानामुळे अनेकदा युवराजवर तसेच त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. मात्र आता योगराज हे सारं मानसिक समस्येमुळे बोलत आहेत की काय अशी चर्चा युवराजच्या विधानानंतर सुरु झाली आहे.