मुंबई : श्रीलंकेविरूद्ध आगामी एकदिवसीय दौऱ्यामध्ये भारताचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंगला संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू असतानाच निवडसमितीचा प्रमुख घटक असलेल्या एमएसके प्रसाद यांनी एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रीया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे की, आम्ही युवराजला काही काळासाठी विश्रांती दिली आहे. याचा अर्थ असा नाही की, त्याचे सर्व दरवाजे बंद झाले. अनेकांनी युवराजचा संघात समावेश झाला नाही, याचा अर्थ त्याचे करिअर संपले असा घेतला. पण, आम्ही विश्वचषकाच्या दृष्टीने संघ तयार करतो आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त युवा खेळाडूंना कशी संधी देता येईल यावर सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे युवराजच्या करिअरवर कोणताही प्रश्न निर्माण करू नये, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.


पूढे बोलताना एमएस प्रसाद यांनी म्हटले की, कोणत्याही खेळाडूसाठी दरवाजा कधीच बंद होत नाही. सर्वांनाच क्रिकेट खेळण्याचा अधिकार आहे. ती त्यांची क्रेझ आहे. आणि ते तिचा पाटलाग करत असतात. आम्ही अनेक पद्धती आजमावू इच्छितो. संघातील सर्व खेळाडू ठरवताना सर्व शक्यता विचारात घेतल्या गेल्या होत्या. तसेच, सर्वांच्या नावाचा विचारही करण्यात आला होता.


दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ते सबा करीम यांनी सांगितले की, डावखुरा गोलंदाज असलेल्या युवराजला भारतीय क्रिकेट संघात पुनरागम करणे हे आता कठीण असेन. युवराज हा एखाद्या योध्याप्रमाणे आहे. पण, विश्वचषकासाठी त्याला निवडसमिती तंदुरूस्त मानेल असे मला वाटत नाही. 20 षटकांचा सामना आणि 50 षटकांचा सामना यात मोठा फरक असतो. सध्यास्थितीला मनीष पांडे ताकदवान खेळाडू आहे आणि त्याला सध्या चांगल्या संधीची आवश्यकता आहे, असेही सबा करीम यांनी म्हले आहे.