मुंबई: युजवेंद्र चहल सध्या आयपीएलची तयारी करत आहे. युजवेंद्र आणि धनश्री वर्माची जोडी सोशल मीडियावर तशी सर्वांचीच लाडकी आहे. धनश्रीचे चाहते तर तिच्या व्हिडीओची आतूरतेनं वाट पाहात असतात. मात्र आता युजवेंद्र आणि धनश्रीमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोकांनीही मनभरून कमेंट्स केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो धनश्रीसोबत वाद घालताना दिसत आहे. त्यांच्यात मजेमजेत वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहिलं तर लक्षात येईल धनश्रीने युजवेंद्रला प्लेज दिली. त्यामध्ये आलू पराठे असल्याचं सांगितलं. 


युजवेंद्र त्यावर म्हणाला यामध्ये बटाटे कुठे आहेत? मग धनश्री म्हणते, 'काश्मिरी पुलावमध्ये कश्मीर थोडीच दिसतो. बनारसी साडीत बनारस दिसतो का?'. हे ऐकल्यावर युजवेंद्र चाट पडला. त्यांच्यातील या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 




या व्हिडीओवर धनश्री म्हणते की हा व्हिडीओ तरी शेअर करायला नको होता. तर त्यावर शिखर धवनने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. धनश्री वर्माचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे. याशिवाय ती हिप-पॉप ट्रेनिंग देते. डिसेंबर 2020 मध्ये धनश्री वर्मा आणि युजवेंद्र विवाहबंधनात अडकले. युजवेंद्र सध्या आयपीएलची तयारी करत आहे.