मुंबई : भारताचे माजी फास्ट बॉलर जहीर खान, आरपी सिंग आणि प्रवीण कुमार पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत. शारजाहमध्ये होणाऱ्या टी-१० लीगमध्ये खेळण्यासाठी या तिघांनी करार केला आहे. ८ टीममधली ही टी-१० स्पर्धा २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत शारजाहमध्ये खेळवण्यात येणार आहे. या तीन खेळाडूंबरोबरच एस. बद्रीनाथ आणि रितेंदर सिंग सोदीदेखील या टी-१० लीगमध्ये दिसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण कुमारनं मागच्याच आठवड्यात क्रिकेटमधून संन्यास घेतला. तर आरपी सिंगनं मागच्या महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला. या विजयात आरपी सिंगनं महत्त्वाचं योगदान दिलं. त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा आरपी सिंग दुसरा बॉलर होता. ब्रदीनाथनंही काहीच दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. २०११ साली वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा जहीर सदस्य होता. जहीरनं सगळ्या फॉरमॅटमध्ये ६०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या.


याआधी वीरेंद्र सेहवाग आणि शाहिद आफ्रिदीची या लीगचा आयकॉन म्हणून नियुक्ती झाली होती. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम या स्पर्धेच्या टॅलेंट सर्च प्रोग्रामचा संचालक आहे.