Pakistan vs Zimbabwe Celebration : पाकिस्तान आणि झिम्बॉम्वे (Pakistan vs Zimbabwe) यांच्याच रंगलेल्या थरारक सामन्यात दुबळ्या झिम्बॉम्वेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. झिम्बॉम्वेने दिलेला 130 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दैना उडाली आणि अखेर पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला लोळवल्यानंतर झिम्बॉब्वेचं ड्रेसिंग रूममध्ये (Zimbabwe Celebration in dressing room) खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. तरीही पाकिस्तानला (PAK vs ZIM) सामना जिंकता आला नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाव्बेने पाकिस्तानला 131 रन्सचं टारगेट दिलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना 129 पर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 9 रन्स करता आल्यानं पाकिस्तानचा पराभव झालाय. कोणालाच अपेक्षा नव्हती असा हा विजय होता, त्यानंतर सेलिब्रेशन देखील खास होतं.


आणखी वाचा - PAK vs ZIM : शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं?


अटीतटीच्या सामन्यात मोठा विजय मिळवल्याने झिम्बाव्बे खेळाडूंना आनंद अनावर झाला. झिम्बाव्बेच्या खेळाडूंनी गाणं म्हणत खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. Vasanamada mukkiyam Vibe pannungada, असं गाणं म्हणत झिम्बाव्बेच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला आहे.


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ सेमिफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिकंदर राजाने चार षटकात 25 धावा देत 3 विकेट घेतले या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर आता पाकिस्तानचं सेमिफायनलचं स्वप्न अपुर्णच राहणार असल्याचं दिसतंय.