PAK vs ZIM : थरारक सामन्यात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, वाचा शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं?

Pakistan vs Zimbabwe : T20 विश्वचषकाच्या आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तान विरुद्ध सनसनाटी​विजय....अखेरच्या 4 चेंडूवर 4 धावांची गरज असताना पाकिस्तनाच्या फलंदाजांना केवळ दोनच धावा करता आल्या... पाहा थरारक ओव्हर

Updated: Oct 27, 2022, 09:00 PM IST
PAK vs ZIM : थरारक सामन्यात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, वाचा शेवटच्या ओव्हरला काय काय घडलं? title=
Pakistan vs Zimbabwe Last Over

Pakistan vs Zimbabwe Last Over : पाकिस्तान आणि झिम्बॉम्वे (Pakistan vs Zimbabwe Highlights) यांच्याच रंगलेल्या थरारक सामन्यात दुबळ्या झिम्बॉम्वेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोणालाही अपेक्षित नव्हता असा सामना रंगला. झिम्बॉम्वेने दिलेला 130 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दैना उडाली आणि अखेर पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. तर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. मात्र, पाकिस्तानला (PAK vs ZIM) पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. 

वाचा शेवटच्या ओव्हरचा थरार.... (Pakistan vs Zimbabwe Last Over)

19.1 - Brad Evans विरुद्ध Mohammad Nawaz - ईव्हान्सने पहिला बॉल ऑफसाईडला टाकला. त्यावेळी नवाझने स्तब्ध उभं राहत मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कवरच्या वरून शॉट खेळला. त्यावेळी संघाला तीन रन मिळाले.

19.2 - Brad Evans विरुद्ध  Mohammad Wasim - ईव्हान्सचा दुसरा बॉल स्लो टाकण्याचा प्रयत्न केला. लेगला टाकलेल्या या बॉलवर वसीमने फोर मारला. त्यामुळे आता पाकिस्तान जिंकेल, असं सर्वांनाच वाटलं. आता 4 बॉलवर 4 धावांची गरज होती.

19.3 - Brad Evans विरुद्ध  Mohammad Wasim - ईव्हान्सने तिसरा बॉल ऑफसाईड ऑल टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसीमला हा बॉल व्यवस्थित उचलता आला नाही. त्यामुळे या बॉलवर एकच रन मिळाला.

19.4 - Brad Evans विरुद्ध Mohammad Nawaz - ईव्हान्सने चौथा बॉल चतुराईने टाकला. खाली राहिलेला हा बॉल नवाझला खेळता आला नाही. त्यामुळे आता झिम्बॉब्वेचा आशा आता वाढल्या होत्या. आता 2 चेंडूवर 3 धावांची गरज होती.

19.5 - Brad Evans विरुद्ध Mohammad Nawaz - ईव्हान्स टाकलेला हा बॉल सामन्याचा टर्निंग पॉईंट राहिला. हा बॉलवर ईव्हान्सने गुड लेंथ केला. त्यामुळे मोठा फटका मारण्याच्या नादात नवाझने आपली विकेट गमावली. आता 1 बॉलवर 3 धावांची गरज होती.

19.6 - Brad Evans विरुद्ध Shaheen Afridi - नवाझ बाद झाल्यानंतर अफ्रिदी स्टाईकवर आला. त्याने कवरच्या दिशेने बॉल खेळला. दोन्ही खेळाडू वाऱ्याच्या वेगाने पळाले. मात्र, त्यांना फक्त 1 धाव घेता आली. विकेटकिपरकडून गडबड झाली आणि थ्रो केलेला कॅच वेळेवर पकडता आला नाही. मात्र, शाहिन अफ्रिदी खुप लांब असल्याने विकेटकिपरला वेळ मिळाला आणि त्याने आपलं काम पुर्ण केलं.

आणखी वाचा - T20 World Cup : पाकिस्तानमध्ये पुन्हा फुटले टीव्ही; दुबळ्या झिम्बाब्वेनेही हरवलं

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसली. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम 9 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स करू शकला, तर मोहम्मद रिझवानने 16 बॉल्ममध्ये 14 रन्स करू शकला. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 रन्स केले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 रन्सचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. दुसरीकडे झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने 3 विकेट्स घेतलेत.