पर्यटनासाठी हे १० देश भारतापेक्षा स्वस्त
तेव्हा भारतापेक्षा कमी खर्चात तुम्हाला या देशांमध्ये पर्यटन करता येईल, जगात असे कोणते १० देश आहेत
मुंबई : तुम्हाला परदेशात पर्यटनासाठी जायचं असेल, तर संबंधित देशात किती खर्च होईल अशी शंका येते कारण रूपयाच्या कितीतरी पट तेथील स्थानिक चलन मोठं असतं, मात्र काही असे देश आहेत तेथे रूपया तेथील स्थानिक चलनाच्या मानाने मजबूत नाही, यामुळे भारतापेक्षाही या देशात स्वस्ताई तुमच्यासाठी असेल, तेव्हा भारतापेक्षा कमी खर्चात तुम्हाला या देशांमध्ये पर्यटन करता येईल, जगात असे कोणते १० देश आहेत ते पाहु या.
व्हियतनाम
व्हियतनाम हा एक सुंदर देश म्हणून ओळखला जातो, येथे एक रूपयाची किंमत ३५३ वियतनाम डोंग आहे. स्ट्रीट फूडसाठी हा देश प्रसिद्ध आहे.
इंडोनेशिया
इंडोनेशिया देखील सुंदर आहे, याला बेटांचा समूह म्हटलं जातं, भारताचा रूपयाच्या बदल्यात इंडोनेशियाचं चलन २०७ रूपईया तुम्हाला मिळू शकतात.
पराग्वे
काही तरी साहसपूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी पराग्वे आहे, येथे रूपयाच्या बदल्यात तुम्हाला ८६.९६ ग्वारानी मिळतील. ग्वारानी हे पराग्वेचं चलन आहे.
कंबोडिया
कंबोडिया हिरवळीसाठी ओळखला जातो, येथे एक रूपयाच्या बदल्यात तुम्हाला कंबोडियाचं चलन ६३ रियाल मिळतील.
मंगोलिया
मंगोलियातही भारतीय चलनाची स्थिती चांगली आहे, येथे रूपयाच्या बदल्यात ३७ तुगरिक मिळू शकता. खवैय्येगिरी म्हणजे काय असतं हे तुम्ही मंगोलियात जाऊन अनुभवू शकतात.
कोस्टा रिका
कोटा रिका हा मध्य अमेरिकी देश आहे, रूपयाच्या बदल्यात तुम्हाला येथे ९ कोस्टारिकन कोलोन मिळतील. कोस्टा रिका जैवविविधतेसाठी ओळखला जातो, प्राचीन समुद्र तट आणि रंगीत पाणी पाहायचं असेल तर कोस्टा रिकाची सफर करा. ज्युरासिक पार्कची शुटिंग याच देशात झाली होती.
हंगेरी
हंगेरीत तुम्हाला एक रूपयाच्या बदल्यात ४ फोरेटे मिळतील. हंगेरी मध्य युरोपचा सुबत्ता असलेला देश आहे. ज्यांना वाटत असेल युरोप जाणे महाग आहे, त्यांनी हंगेरीबद्दल विचार केलेला कधीही चांगला.
आईसलँड
रूपयाच्या बदल्यात आईसलँडची क्रोना करंसी दुप्पट कमी आहे. हा देशात फार थंडी असते, उन्हाळ्यात येथे एन्जॉय करता येईल.
श्रीलंका
श्रीलंकेबद्दल आपल्याला माहित आहे, रूपयाच्या बदल्यात येथे २.३० श्रीलंकाई रूपया मिळतो, सुंदर समुद्र तट, जंगल, पहाड, चहाचे मळे पाहायचे असतील तर श्रीलंकेला जा.
पाकिस्तान
पाकिस्तानात भारतीय रूपयाच्या बदल्यात १.६३ पाकिस्तानी रूपया मिळेल.