नवी दिल्ली : डिजीटल क्रांतीमुळे जग बदलत आहे. येथे काहीही कधीही चर्चेत येतं. अशीच एक गोष्ट काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती ती म्हणजे  #10YearsChallenge या चॅलेंजमध्यो लोकांनी आपल्या आताचा आणि 10 वर्ष आधीचा फोटो शेअर केला. इंस्टाग्रामसह इतर अनेक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर ते शेअर करण्यात आले. तशी तर ती एक मजेदार गोष्ट होती. पण या चॅलेंजमुळे जगभरातील टेक्नोलॉजी एक्सपर्ट्ससमोर एक प्रश्न उभा राहिला आहे. एक्सपर्ट्सच्या मते, याच्या माध्यमातून तुमचं फेसियल रिकग्नाइजेशन चोरीला गेलं आहे. यामुळे तुमचा डेटा चोरी झाला आहे. जे तुमच्या गोष्टींना सुरक्षित ठेवतो. जवळपास 5.5 कोटी यूजर्सने या हॅशटॅगसह आपला फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.


गोपनीय माहिती चोरीला जाणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पासवर्ड किंवा पिनने तुमचं अकाऊंट आणि इतर अनेक सुरक्षित होत्या. त्यानंतर फिंगरप्रिंट आलं आणि आता फेस रिकग्नाइजेशन. म्हणजे आता फोन लॉक ओपन करण्यासाठी ते पेमेंट करण्यासाठी देखील तुमचा चेहरा स्कॅन होतो. आता तुम्ही कसे दिसता याची ओळख पटवण्यासाठी #10YearsChallenge चा वापर करण्यात आला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात मोठे मोठे सेलेब्रिटी, उद्योगपती आणि सामाजिक लोकांनी देखील हे चॅलेंज पूर्ण केलं. फेसबुकच्या माध्यमातून हे संपूर्ण भारतात पसरलं. टेक्नोलॉजी एक्सपर्ट्सने दावा केला आहे की, याचा वापर पुढे डेटा चोरी करण्यासाठी केला जाऊ शकतो.


डेटा कसा चोरीला जाणार?


या चॅलेंजमुळे ऑर्टिफीशियल इंटेलिजेंस (AI) वर काम करणाऱ्या मशीनला कोणत्याही व्यक्तींचे असे २ फोटो मिळतील ज्यामध्ये १० वर्षाचा फरक आहे. याच्या मदतीने मशीनसाठी ही समजणं सोपं होऊ जाईल की, १० वर्षापूर्वी या व्यक्तीचा चेहरा कसा होता. यामुळे तुमची माहिती सहज त्या मशीला उपलब्ध होईल.


कोणी उठवला आवाज?


लेखिका केट ओ नीलने त्यांच्या पोस्टमध्ये या संपूर्ण अभियानाच्या मागे काय आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, या अभियानाच्या माध्यमातून आपण मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्यांना आपण एक खास प्रकारचा डेटा देत आहोत. केट यांचं मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या संशयावर गांभिर्याने पाहिलं जात आहे. केट यांना वाटतं की, हे अभियान फक्त फोटो जमा करण्यासाठी आहे. मोठ्या टेक कंपन्या याच्या मदतीने एक खास प्रकारचा डेटा जमा करत आहे. या अभियानातून कंपन्यांना घरी बसल्या माणसं ओळखणं सोपं होणार आहे. फेसबुकवर देखील अनेकदा डेटा चोरीचा आरोप लागला आहे.