मुंबई : जगात सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप व्हॉट्सअॅपचे लवकरच आणखी २ नवे फीचर अपग्रेड होणार आहेत. कंपनी सध्या यावर काम करत असून लवकरच हे २ नवे फीचर्स युजर्सला वापरता येणार आहेत. डार्क मोड (Dark Mode) आणि सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज असे २ नवे फीचर्स व्हॉट्सअॅप लवकरच घेऊन येत आहे. सध्या या दोन्ही फीचर्सचं बीटा व्हर्जनवर डेवलप केले जात आहेत. व्हॉट्सअॅप हे फीचर आणण्यात तसा मागे पडला आहे. कारण इतर अॅपने हे फीचर आधीच मार्केटमध्ये आणलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Telegram आणि Signal अॅपने याआधीच युजर्ससाठी सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज फीचरची सुविधा आणली आहे. डार्क मोड सारखे फीचर ट्विटर आणि यूट्यूबवर आहेत. काही दिवसांपूर्वीच Instagram ने देखील हे फीचर आणलं होतं.


सेल्फ डिस्ट्रक्टिंग मॅसेज


हे एक खास फीचर आहे. ज्यामुळे एका विशिष्ठ वेळेनंतर मॅसेज स्वत:च गायब होऊन जातील. यामध्ये वेळेची मर्यादा 5 सेकंद, एक तास, ७ दिवस किंवा ३० दिवस अशा प्रकारे असतात. हे फीचर इनएब्लड केल्यानंतर मॅसेज गायब होऊन जातील. सध्या हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी असणार आहे.


डार्क मोड


व्हॉट्सअॅपमध्ये अपग्रेड होणारं हे नवीन फीचर खास असणार आहे. या फीचरमध्ये बॅक ग्राउंडला ब्लू नाईट रंग दिसणार आहे. पण टेक्स्टचा रंग कोणता असणार हे अजून समोर आलेलं नाही. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी लाईट थीम वरुन डार्क थीममध्ये स्विच करण्याचा पर्याय देणार आहे. युजर्स सिस्टममध्ये डिफॉल्ट म्हणून देखील ते निवडू शकता.