मुंबई : सेकेंड जनरेशनची होंडा Amaze भारतात लाँच झाली आहे. कंपनीने या Honda Amaze ची किंमत 5.59 लाख रुपये एक्स शोरूमची आहे. देशभरात होंडा डिलर्सने या कारसाठी सुरूवातीपासूनच बुकिंग घ्यायला सुरूवात केली आहे. आशा आहे की, पुढच्या आठवड्यात याची डिलिव्हरीला देखील सुरूवात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 होंडा अमेझचे चार वेरिएंट आहेत. Honda Amaze E, Honda Amaze S, Honda Amaze V आणि Honda Amaze VX सादर केलं आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये फोर सिलेंडर असून 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. ज्याची 90 PS पावर आणि 110Nm चे टार्क जेनरेट देण्यात आले आहेत. यामध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आळं आहे. ज्यामध्ये 100 PS चे पावर आणि 200 Nm टॉर्क जेनरेट केलं आहे. 


या नवीन होंडा अमेझमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीमध्ये ट्रान्समिशनसाठी CVT गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. पहिल्यांदा जेव्हा होंडाने भारतमध्ये डिझेल इंजिनमध्ये CVT ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या नव्या अमेजच्या डिझाइनमध्ये भरपूर स्पेस देण्यात आली आहे. होंडाने रिअरमध्ये व्हीलबेस वाढवण्यात आलं आहे. सेफ्टीसाठी नवीन कारच्या सर्व वेरिएंट्समध्ये फ्रंट SRS एअरबॅग्स, EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन देण्यात आलं आहे. एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंगसोबत ब्रेक असिस्ट देण्यात आलं आहे. 


वेरिएंट                                     पेट्रोल                     डीझेल                         


Honda Amaze E MT        5.59 लाख रुपये     6.69 लाख रुपये


Honda Amaze S MT        6.49 लाख रुपये     7.59 लाख रुपये


Honda Amaze V MT       7.09 लाख रुपये     8.19 लाख रुपये


Honda Amaze VX MT     7.57 लाख रुपये     8.67 लाख रुपये


Honda Amaze S CVT      7.39 लाख रुपये     8.39 लाख रुपये


Honda Amaze V CVT     7.99 लाख रुपये     8.99 लाख रुपये