३०० हुन अधिक आयफोन-१० चोरीला...
अमेरिकेतील सेन्ट फ्रांसिस्कोमध्ये चोरांनी तब्बल ३७०,००० डॉलर किंमतीचे ३०० आयफोन चोरी केले.
सेन्ट फ्रांसिस्को : अमेरिकेतील सेन्ट फ्रांसिस्कोमध्ये चोरांनी तब्बल ३७०,००० डॉलर किंमतीचे ३०० आयफोन चोरी केले. सीएनईटीच्या रिपोर्टनुसार, तीन चोरांनी सेन्ट फ्रांसिस्को येथील अॅपल स्टोरच्या बाहेर उभे असलेल्या यूपीएस ट्रकमधून अॅपलच्या स्मार्टफोन्सची चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक ३१३ अॅपल आयफोन १० च्या डिलिव्हरीसाठी जात होता. त्यात प्रत्येक आयफोन हा ९९९ डॉलरचा होता.
या प्रकरणी अमेरिकेच्या पॅकेज वितरण कंपनी यूपीएस यांनी सांगितले की, चोरीचा तपास करण्यासाठी कायदा प्रवर्तक संस्था मदत करत आहेत.
अॅपल आयफोनमध्ये असलेल्या 'फाइंड माय आयफोन' किंवा 'रिमोट लॉकआऊट' फीचरने चोरी केलेला फोन शोधू शकतात. त्यामुळे आयफोनच्या चोरीचे प्रकरण कमी झाले होते. मात्र शक्कल लढवत चोरांनी ही सेवा सुरु होण्याआधीच आयफोनची चोरी करत आहेत.
भारतात आयफोन-१० (६४ जीबी) शुक्रवारपासून ८९,००० रुपयांना मिळत आहे. याला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.