नवी दिल्ली : ऑनलाईन असे अनेक अॅप्स आहेत जे आपले मनोरंजन करतात. त्यामध्ये गेम, कॅमेरा, ब्यूटी अॅप, लोकेशन ट्रॅकर यांसारखे अनेक अॅप्स आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे का ? की असे ही काही अॅप्स आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. जाणून घेऊया अशाच काही  अॅप्सबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lopscoop :
या अॅपच्या मदतीने तुम्ही सर्व फिल्डबद्दलच्या बातम्या जाणून घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही माहिती घेण्यासोबतच पैसे देखील कमाऊ शकता. यासाठी युजर्सना दिवसाला ५ आर्टिकल्स वाचावे लागतील. त्याबदल्यात तुम्हाला रोज काही पॉईंट्स मिळतील. हे पॉईंट्स तुम्ही इनकॅश करू शकता आणि जमा झालेले पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. हे अॅप तुम्ही गूगल प्ले स्टोर वरून फ्री डाऊनलोड करू शकता. 


Foap :
हे अॅप तुमचा फोटो बघून पैसे देतं. म्हणजे या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो काढून पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला या अॅपवर तुमचे अकाऊंट बनवावे लागेल. ते फ्री आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा काढलेला फोटो अॅपवर अपलोड करून  
त्याची किंमत लावू शकता. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या नाव नव्या फोटोंच्या प्रतीक्षेत असतात. अशा प्रकारे या अॅपमधून तुम्ही पैसे कमावू शकता. हे पैसे तुम्हाला पेपाल च्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातील. 


Slidejoy :
अॅनरॉईड फोनच्या लॉक स्क्रीनला प्रमोट करणारं हे एक फ्री अॅप आहे. या अॅपचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईनअप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही लॉकस्क्रीन थीम निवडू शकता. यात जाहिराती असतात. युजर्सला जाहिराती बघण्याच्या बदल्यात कॅरेट्स मिळतात. १००० कॅरेट्स ची किंमत १ डॉलर म्हणजे ६६ रुपये आहे. तुम्ही कमावलेले पैसे १५ दिवसात पेपालच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. 


Ibotta
शॉपिंग झाल्यानंतर बिल फेकून देऊ नका. ही बिलं तुम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतील. यासाठी तुम्हाला बिलाचा फोटो काढून अॅपवर अपलोड करायचा आहे. त्याबदल्यात युजर्सना कमिशन मिळेल. हे अॅप तुम्ही गूगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकता. 


AppTrailers App :
हे अॅप व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देतं. यासाठी तुम्हाला ३० सेकंद व्हिडीओ बघावा लागेल. यासाठी तुम्हाला हे अॅप मोबाईलमध्ये इंस्टाल करावे लागेल. येथे तुम्हाला व्हिडीओ बघण्याचे आणि डाउनलोड करण्याचे पैसे मिळतील.