10 हजाराहून कमी किंमतीतले 5 बेस्ट स्मार्टफोन
5 हजार पासून ते लाखभराच्या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये आपण आपल्या बजेटमधला फोन शोधत असतो.
मुंबई : सध्याच्या या धावपळीच्या जगात स्मार्टफोनचं महत्त्व वाढलंय. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनी दरवेळेस नवे फिचर्स घेऊन येते. स्मार्टफोनच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. 5 हजार पासून ते लाखभराच्या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये आपण आपल्या बजेटमधला फोन शोधत असतो. आम्ही तुम्हाला तुमचा बजेट फोन शोधण्यास मदत करणार आहे. तुमचं बजेट 10 हजार किंवा त्याहून कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
रिलेमी 2
चायना स्मार्टफोन निर्माता कंपनी रिजेयलमीचा रिलेमी 2 हा स्मार्टफोन 8 हजार 990 रुपयांपर्यंत मिळू शकेल. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅमसहित 32 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मिळत आहे.
या व्यतिरिक्त फोनमध्ये 12 एमपी आणि 2 एमपीचा ड्युयल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेलायं.
फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये कंपनीने 8 एमपीचा कॅमेरा दिलायं. साधारण 9 हजारच्या रेंजमधील या फोनमध्ये एकूण 3 कॅमेरा आहेत.
रेडमी 6
तुमचा बजेट जर 10 हजार पेक्षा कमी असेल तर रेडमी 6 (Redmi 6) तुमच्यासाठी चांगला पर्याय असणार आहे. यासाठी तुम्हाला 9 हजार 499 रुपये मोजावे लागतील.
या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम सहित 64 जीबी स्टोरेज कॅपिसिटी आहे. याशिवाय फोनमध्ये 12 एमपी आणि 5 एमपीचा ड्युयल रियर कॅमेरा सेटअप दिला गेलायं.
सेल्फी शौकिनांसाठी 5 एमपीचा कॅमरा दिला गेलायं. या फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी असणार आहे.
हॉनर 7 S
हुवावेईचा सब ब्रॅण्ड असलेल्या हॉनरने काही दिवसांपुर्वी भारतीय बाजारपेठेत Honor 7S लॉंच केलायं. हा फोन एक चांगला बजेट फोन ठरतोय.
यामध्ये 2 जीबी रॅम सोबत 16 जीबी इंटरनल स्टोरेज दिलं गेलंय. हॉनर 7S मध्ये 5.45 इंच टीएफटी फुल व्ह्यू डिस्प्ले आहे.
फोनची इंटरनल स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून 256 पर्यंत वाढवू शकता.
शाओमी रेडमी Y2
शाओमी रेडमी (Redmi Y2) चा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजचा वेरिेएंट तुम्हाला बाजारात 9 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे.
यामध्ये जर तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज वाला वेरिएंट हवाय तर त्यासाठी 12 हजार 999 रुपये द्यावे लागतील.
या फोनला 5.99 इंचचा एचडी डिस्प्ले आहे. सेल्फी शौकिनांसाठी 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
लिनोवो K9
10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट वाल्या स्मार्टफोनमध्ये लिनोवो के 9 (Lenovo K9) देखील चांगला ऑप्शन आहे.
या स्मार्टफोनची बाजारातील किंमत 8 हजार 999 रुपये आहे. लिनोवो K9 मध्ये 13 एमपी कॅमेरा आणि 5 एमपी ड्युयल रियर कॅमेरा मिळतोयं.
स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजदेखील देण्यात आलायं. ग्लास बॉडीसोबत येणाऱ्या फोनचा लुक खूपच प्रिमियम आहे.