5G ठरतंय धोकादायक! विमानांचे इंजिन आणि ब्रेक होताहेत फेल; एअर इंडियाची उड्डाणं रद्द
5 जी सेवेमुळे निर्माण होणाऱ्या वेगळ्याच अडचणीचा सामना सध्या भारत, अमेरिका आणि जपान आदी देशांना करावा लागत आहे.
मुंबई : देशात 5 जी सेवेची प्रतिक्षा केली जात आहे. 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत. आता लवकरात लवकरत 5 जी नेटवर्क देखील सुरू व्हावं अशी वापरकर्त्यांची इच्छा आहे. परंतू 5 जी सेवेमुळे निर्माण होणाऱ्या वेगळ्याच अडचणीचा सामना सध्या भारत, अमेरिका आणि जपान आदी देशांना करावा लागत आहे. या देशांमध्ये अनेक विमानांची उड्डाणं 5 जी टेक्नॉलॉजीमुळे रद्द करावी लागत आहेत.
एअर इंडियाचा इशारा
भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने ट्विट करून म्हटले की, अमेरिकेच्या विमानतळांवर आज 5 जी कम्युनिकेशन डिप्लॉय करण्यात येणार आहे. या इंटरनेट सेवेचा थेट परिणाम विमानांच्या उड्डाणांवर होईल.
विमानांच्या कंट्रोल सिस्टिमवर होईल. 5जी नेटवर्कमुळे विमानावर नियंत्रण ठेवणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे एअर इंडियाने भारतातून अमेरिकेत जाणारी अनेक उड्डाणं रद्द केली आहेत.
अमेरिकेत 5 जी सेवा सुरू होण्याआधी सरकारला इशारा देण्यात आला होता. अमेरिकेतील प्रवासी आणि कार्गो विमान कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून 5 जी सेवा सुरू झाल्या झाल्या उड्डाणांना अडचणी आणि इतर समस्या होत असल्याचे म्हटले आहे.
5 जी ठरतंय धोकादायक
अमेरिकेच्या विमानतळांना 5 जी सेवेचे बफर झोन बनवण्यात आले आहे. यामुळे या अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 5 जी मुळे विमानांच्या altimeters वर परिणाम होऊ शकतो. हे असे उपकरण असते, की ज्यामुळे कोणत्याही स्थानाची उंची मोजता येते.
विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, 5 जी टेक्नॉलॉजीमुळे लो विजिबिलीटी ऑपरेशंन्समध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तसेच विमानाचे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टिमवर लॅंडिंग मोडवर जाण्यासही अडथळा निर्माण होऊ शकतो. विमान एरअरपोर्टवर लॅंड करणे धोकादायक ठरू शकते.