WhatsApp Fraud: सध्याच्या युगात आपण बऱ्याच प्रमाणात इंटरनेटवर (Internet) अवलंबून आहोत. छोटी माहिती मिळवायची असो किंवा मग एखादा मोठा व्यवहार करायचा असेल तर आपण इंटरनेटरची मदत घेतो. भारतामध्ये रोख पैशांच्या तुलनेत ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण यातून निर्माण होणारा धोकाही तितकाच आहे. असाच काहीसा फटका एका महिलेला बसला आहे. एका WhatsApp Call मुळे महिलेने तीन लाख रुपये गमावले आहेत. विशेष म्हणजे ही महिला बँक कर्मचारी आहे. तुमचीही अशाप्रकारे फसवणूक (Online Fraud) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बातमी नक्की वाचा...


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुग्राम (Gurugram) येथील एक महिला बँक कर्मचाऱ्याला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आपण आपल्या मित्राला पैसे पाठवत आहोत असा महिलेचा समज झाल्याने तिने तीन लाख रुपये पाठवले. पण नंतर आपली फसवणूक झाल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. 


महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला WhatsApp वर एका नंबरवरुन एक फोन आला होता. या व्हॉट्सअप नंबरच्या प्रोफाइलला आपल्या मित्राचा फोटो होता. फोनवर नीट आवाज ऐकू येत नव्हता. मात्र काही काळाने आपल्या मोबाइलवर एक मेसेज आला. यामध्ये आपल्या घरी एक संकट निर्माण झालं असून पैशांची तातडीने गरज असल्याचं लिहिलं होतं. त्याने मला दोन  UPI ID पाठवले आणि पैसे पाठवण्यास सांगितलं. यानंतर मी माझ्यासह, बहिण आणि भावाच्या खात्यांवरुन एकूण 3 लाख रुपये पाठवले होते. 


महिलेने आपल्या मित्राला फोन केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. मित्राने आपण कोणतेही पैसे मागितले नसल्याचं सांगितल्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. 


महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. बँकेला माहिती देत पाठवलेली रक्कम गोठवण्याचा प्रयत्न सुरु आहे".