मुंबई : दूरसंचार क्षेत्रात नोकऱ्यांवर आलेली गदा पाहता सरकारने पर्यायी रोजगाराची मदत करण्यास सुरूवात केली आहे. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी यासंदर्भात माहिती दिली. रिलायन्स जियो बाजारात आल्यानंतर ९० हजाराहून अधिक नोकऱ्या गेल्या. 'टाईम्स नाऊ'ने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसा बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सरकार तीन स्तरावर प्रयत्न करत आहे. यातील सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्यांच भविष्य सुनिश्चित केल जाणार आहे. जेणेकरुन त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम होऊ नये. असे दूरसंचार सचिव सुंदरराजन यांनी गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. आम्ही सार्वजनिक वाय फाय आणि भारतनेटसारख्या रोजगाराच्या नव्या संधी आणण्याच्या प्रयत्नात असल्याचेही ते म्हणाले. नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार मिळण्यासाठी सरकार दूरसंचार क्षेत्र कौशल परिषदेसोबत मिळून काम करत आहे. यातून बेरोजगारांना रोजगार शोधता येत असल्याचेही ते म्हणाले.  


५ जीद्वारे भारताची मोठी झेप 


सरकारद्वारा निवडलेलं पॅननल पुढच्या महिन्यात ५ जी टेक्निकसंदर्भातील आपला अहवाल सुपूर्द करणार आहे. यामध्ये ५ टेक्निक सादर करण्याची रुपरेषा असणार आहे. ५ जी मुळे भारत एक मोठी उडी घेणार असून स्वत: आपली क्षमता विकसित करणार असल्याचा विश्वास यावेळी सुंदरराजन यांनी व्यक्त केला.