मुंबई : देशातील मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी मान्सून ऑफर लाँच केलीये. या ऑफरनुसार कंपनी एक जुलैपासून पुढील तीन महिने ३० जीबी डेटा मोफत देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी एप्रिल ते जूनपर्यंत ३० जीबी फ्री डेटाची सरप्राईज ऑफर दिली होती. मान्सून ऑफरअंतर्गत पोस्टपेड़ ग्राहकांना दर महिन्याला १० जीबी डेटा पुढील तीन महिन्यांपर्यंत फ्री मिळणार आहे. 


ही ऑफर १ जुलैपासून सुरु होतेय. शनिवारी ईमेलद्वारे एअरटेलने या नव्या ऑफरची माहिती आपल्या ग्राहकांना दिली. ही ऑफर सुरु करण्यासाठी ग्राहकांना १ जुलैनंतर माय एअरटेल अॅपवरुन क्लेम करावी लागेल. ही ऑफर केवळ पोस्टपेड ग्राहकांना दिलीये.