मुंबई : एअरटेल आणि जिओमध्ये सध्या डेटा वॉर सुरू आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल नवनवीन प्लॅन सादर करत आहे.


 एअरटेलने रिव्हाईज केला प्लॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एअरटेलने ३४९ आणि ५४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटाची लिमिट वाढवली आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये आता ५०० एमबी अधिक डेटा मिळेल. एअरटेलच्या ३४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये प्रथम १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल त्याचबरोबर १०० मेसेज मिळत होते. नोव्हेंबरमध्ये एअरटेलने हा प्लॅन रिव्हाईज केला. आता त्यात प्रत्येक दिवशी १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल, मेसेज ही सुविधा द्यायला सुरूवात केली.


काय मिळणार सुविधा?


मात्र जिओसोबतच्या वाढत्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एअरटेल हा प्लॅन पुन्हा एकदा रिव्हाईज केला. आता या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० मेसेज मिळतील. याची २८ दिवसांची व्हॅलिडीटी आहे. आता या प्लॅनमध्ये ५६ जीबी 4G डेटा मिळेल.
यासोबतच एयरटेलने ५४९ रूपयांचा प्लॅन देखील रिव्हाईज केला आहे. पुर्वी या प्लॅनमध्ये २.५ जीबी डेटा आणि लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळत होती. आता या प्लॅनमध्ये दर दिवशी ३ जीबी डेटा आणि लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉल्स मिळतील. म्हणजे या प्लॅनमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळेल.


जिओचा प्लॅन


तर रिलायंस जिओच्या ३०९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ४९ दिवसांसाठी ४९ जीबी डेटा आणि  लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. तर ५०९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ४९ दिवसांसाठी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळेल.