एअरटेल आपल्या ग्राहकांना देत आहे १८ जीबी फ्री डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने एक जबरदस्त ऑफर बाजारात उलब्ध करुन दिली आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने एक जबरदस्त ऑफर बाजारात उलब्ध करुन दिली आहे.
एअरटेलने क्लियरटेक्ससोबत हातमिळवणी करत एन नवी बिझनेस सेवा सुरु केली आहे. या सेवेला जीएसटी अॅडव्हान्टेज असं नाव देण्यात आलं आहे.
जीएसटी भरण्यासंदर्भात अद्यापही नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरणं आहे. मात्र, यावर एअरटेलने एक मार्ग शोधला आहे. हा पर्याय खासकरून छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे. जेणेकरून ते कुठल्याही समस्येशिवाय जीएसटी भरु शकतील.
जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यास एअरटेल फ्री डेटा देणार आहे. जीएसटी फाईल करण्यासाठी तुम्हाला www.airtel.in/gst-advantage येथे जावं लागणार आहे. या सेवेच्या माध्यमातून रजिस्टर करणाऱ्या ग्राहकांना एअरटेलतर्फे १८ जीबी ४ जी डेटा देण्यात येणार आहे. हा डेटा २ जीबी प्रति महिना या प्रमाणे पूढील तीन महिन्यांपर्यंत मिळणार आहे.
युजर्स जीएसटी अॅडव्हान्स डेस्कवर सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत अॅक्सेस करु शकतात. तुम्हाला जीएसटी फाईल करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींसंदर्भातील उत्तरं आणि मदत येथे मिळेल.