मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सध्या स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसएनएलने आधी कमी पैशात डाटा पॅक आणला. आता त्यापुढे पाऊल टाकत आणखी एक खासगी कंपनीने दिवसाला 3 जीबी डाटा देण्याची सुरुवात केलेय. कमी पैशात जास्त डेटा देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी स्पर्धा सुरु झालेली पाहायला मिळत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी चांगला प्लान लॉन्च केलाय. त्यानुसार नव्या रिचार्जची किंमत 181 रुपये आहे. यात ग्राहकाला दिवसाला 3 जीबी डाटा (2 जी, 3जी, 4जी) मिळणार आहे.


181 रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला 3 जीबी डाटासह अमर्याद व्हाईस कॉल (लोकल, एसटीडी आणि रोमिंग), दिवसाला 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या पॅकची मर्यादा 14 दिवसाची असणार आहे. यात ग्राहकाला एकून 42 जीबी डाटा मिळेल.  


दरम्यान, सध्या बाजारात 1.5 आणि 2 जीबी डाटा दिवसाला देण्यात येत आहे. जिओ आणि व्होडाफोनने ही सुविधा दिलेय. मात्र आता दिवसाला 3 जीबा डाटा एअरटेलने देण्यास सुरुवात केलेय. जिओच्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लानला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.