एअरटेलचा नवा धमाकेदार प्लॅन !
होळी निमित्ताने पुन्हा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटा वॉर रंगायला सुरूवात झाली आहे.
मुंबई : होळी निमित्ताने पुन्हा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटा वॉर रंगायला सुरूवात झाली आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने त्यांचा नवा प्लॅन आणला आहे.
एअरटेलचा नवा प्लॅन
एअरटेलने 995 रूपयांमध्ये नवा प्लॅन आणला आहे. 995 रूपयांचा प्लॅन एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत रोमिंग कॉलदेखील मोफत मिळणार आहेत.
एअरटेलच्या या स्पेशल रिचार्ज पॅकमध्ये प्रतिदिन 100 मेसेज मिळणार आहेत.
ग्राहकांना 180 दिवसांसाठी 6 जीबी डाटा मोफत मिळणार आहे. मात्र ग्राहक एका महिन्यात 1 जीबीहून अधिक डाटा वापरू शकणार नाही.
एअरटेल इंडियाच्या या प्लॅनला देशभरात सर्वत्र उपलब्ध करण्यात आले आहे.
जिओला तगडी स्पर्धा
जियोच्या 1999 रूपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंगसोबत 125 जीबी डाटा मोफत मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 180 दिवसांची आहे.
जिओच्या 999 आणि 1,999 रूपयांच्या प्लॅनला आव्हान
एअरटेलच्या नव्या प्लॅनमुळे 999 आणि 1999 रूपयांच्या प्लॅनला आव्हान निर्माण झाले आहे.