एअरटेलने गुपचूप लॉन्च केला तगडा Plan! जिओपेक्षा लयभारी
मोबाईल कंपन्यात सध्या जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. आपल्या ग्राहकांना टिकविण्यासाठी नवनवीन प्लान सादर केले जात आहे.
मुंबई : मोबाईल कंपन्यात सध्या जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. आपल्या ग्राहकांना टिकविण्यासाठी नवनवीन प्लान सादर केले जात आहे. आता एअरटेलने (Airtel) काही दिवसांपूर्वी आपल्या प्लॉनच्या किंमती वाढवल्या होत्या. आता एअरटेलने गुपचूप सर्वात मोठा Plan सादर केला आहे.
Airtel ने Rs 666 चा एक Plan सादर केला (Airtel Rs 666 Plan) आहे, जो अधिक वैधता आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा देत आहे. एअरटेलचा हा प्लॉन रिलायन्स जिओच्या 666 रुपयांच्या प्लॉनसमोर तगडा वाटत आहे. ही योजना ग्राहकांसाठी उत्तम आहे.
एअरटेलचा 666 रुपयांचा प्लॉन
टेलिकॉम टॉकच्या वृत्तानुसार, एअरटेल 77 दिवसांच्या सेवा वैधतेसह 666 रुपयांचा प्रीपेड प्लॉन ऑफर करत आहे. त्यामुळे हा 84 दिवसांचा प्लॉन नाही, पण तो 56 दिवसांच्या प्लॉनइतका छोटाही नाही. या प्लॉनसह, वापरकर्त्यांना 1.5GB दररोजचा डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसाला मिळत आहे. Airtel थॅक्स फायदे मिळतात. यात Amazon Prime Video Mobile Editionचे एका महिन्यासाठी मोफत सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी Apollo 24/7 सर्कल, Shaw Academy, FASTag व्यवहारांवर 100 रुपये कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wink Music यांचा समावेश आहे.
जिओचा 666 रुपयांचा प्लॉन
एअरटेलच्या तुलनेत, जिओचा 666 रुपयांचा प्लॉन वैधतेच्याबाबतीत चांगला दिसतो. जिओच्या या प्लॉनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतील. अतिरिक्त फायद्यांमध्ये, Jio अॅप्समध्ये प्रवेश उपलब्ध आहे. त्याचवेळी, एअरटेलच्या प्लॉनमध्ये अधिक फायदे आहेत.
Vodafone-Idea चा 666 रुपयांचा प्लान
Vodafone-Idea च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळणार आहेत. यूजर्सना ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट ऑफर देखील मिळत आहे. तसेच अतिरिक्त फायद्यांमध्येही एअरटेलचा प्लॉन सर्वोत्तम आहे.