Airtel Unlimited data Plan: आयसीसी विश्वचषक 2023 सुरू झाल्यामुळे भारतात क्रिकेटची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. हळुहळू जग बदलत चालल्याने वर्ल्ड कप पाहण्यासाठी टीव्हीसमोर जमणारी गर्दी आता मोबाईलवर मॅच पाहू लागली आहे. ऑफिसमध्ये, प्रवासात अशा सर्वच ठिकाणी क्रिकेटचे चाहते वर्ल्ड कप पाहत आहेत. यासाठी प्रत्येकाला अनलिमिटेड डेटाची गरज आहे. एअरटेलने ही गरज ओळखली असून यूजर्ससाठी धमाकेदार प्लान आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटरपैकी एक असलेल्या  एअरटेलने क्रिकेटप्रेमींना खूश केले आहे. एअरटेल यूजर्सना स्ट्रीमिंगसाठी रोमांचक डेटा प्लान मिळत आहे.वर्ल्ड कप हळुहळू रोमांचक स्थितीत येत चालला आहे. तसतसे यूजर्सही मॅच पाहण्याची वेळ वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेल यूजर्सची स्ट्रीमिंगची गरजा पूर्ण करत आहे. 


एअरटेल क्रिकेट डेटा प्लॅन


एअरटेलने क्रिकेट चाहत्यांसाठी दोन विशेष डेटा प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे एअरटेल युजर्स विश्वचषक 2023 चा प्रत्येक क्षण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहू शकतील. ही योजना प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असून मॅच पाहण्याचा अधिक चांगला अनुभव देत आहे. एअरटेलचे हे प्लॅन्स काय आहेत? त्याचा ग्राहकांना कसा फायदा होणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन


एअरटेलने क्रिकेटप्रेमींसाठी खास डेटा प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लान केवळ 99 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 2 दिवसांसाठी अमर्यादित डेटा मिळेल. ज्यामुळे तुम्ही ICC विश्वचषक 2023 चा प्रत्येक क्षण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहू शकता.


एअरटेलचा 49 रुपयांचा प्लॅन


एअरटेलने क्रिकेटप्रेमींसाठी परवडणारा डेटा प्लॅन लॉन्च केला आहे जो केवळ 49 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा प्लॅन एका दिवसासाठी 6 GB डेटा ऑफर करतो. एक क्रिकेट सामना पाहण्यासाठी हा प्लान परफेक्ट आहे.


व्हिडीओ कॉल्समध्ये मोठी अपडेट 


दुसरीकडे गुगल सध्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ कॉल ट्रान्सफर करण्याच्या फीचरवर काम करत आहे. आणि हे फिचर लवकरच रोल आउट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. गुगल गेल्या महिन्यापासून 'डिव्हाइस ग्रुप' नावाच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर येणारे व्हिडीओ कॉल्स दुसऱ्या फोनवर सहजपणे ट्रान्सफर करू शकाल.  9to5 ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. अ‍ॅंड्रॉइड डिव्हाईसमधील लिंक फीचर काढून 'डिव्हाइस ग्रुप' नावाचे फीचर आणत आहे. गुगलच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या गुगल खात्याशी लिंक असणारी सर्व उपकरणे सहजपणे कनेक्ट करू शकणार आहात.