मुंबई : सध्या आयफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. Appleचे फोन सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत आणि म्हणूनच बहुतेक लोक फोन खरेदी करताना आयफोनकडे आकर्षित होतात. तसेच Apple त्याच्या यूजर्सना चांगला आणि सुरक्षित अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच Apple त्याच्या युजर्सची कोणत्याही प्रकारची बातमी बाहेर दुसऱ्याच व्यक्तीच्या हातात जाऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो आणि कंपनी त्यात यशस्वी देखील आहे. याच कारणामुळे युजर iphoneकडे वळतात. परंतु अलीकडेच व्हाइसच्या एका अहवालात धक्कादायक बातमी समोर आली आहे, जे काहीतरी वेगळंच सांगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vice च्या अहवालानुसार, एमजी नावाच्या सुरक्षा संशोधकाने एक लाइटनिंग केबल विकसित केली आहे, जी आयफोन चार्ज करते परंतु त्यात एक चिप बसवली आहे. जी यूजरने फोनला लाऊन फोन चार्ज केल्याने त्याच प्रत्येच रोकॉर्ड हॉक होऊ शकतो.  चार्जिंग केबल त्या मोबाईलमधील संपूर्ण माहिती एखाद्या व्यक्तीला पाठवू शकते.


त्यामुळे जर तुम्ही हा चार्जर वापरुन तुमच्या बँकेशी संबंधीत कोणते ही काम केलेत तर ही केबल तुमची संपूर्ण माहिती हॅकरपर्यंत पोहचवू शकेल, ज्यामुळे तुमच्या बँकेच्या संपूर्ण माहितीसह पासवर्ज देखील हॅकरपर्यंत सहज पोहोचू शकतो.


ही केबल कधी बनवली गेली?


Vice च्या अहवालानुसार, MGने प्रथम ही चार्जिंग केबल DEF CON Hacking Conference 2019 मध्ये वापरून दाखवली होती. समस्या अशी आहे की, MGने या केबल्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आणि सायबर सुरक्षा विक्रेता Hak5 यांची विक्रीही सुरू केली.


हे केबल कसे काम करतात?


या चार्जिंग केबल्सचे नाव OMG Cables आहे. हे केबल्स आपोआप एक वायफाय हॉटस्पॉट तयार करतात, ज्यात हॅकर त्याचे डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. मग इंटरफेसद्वारे हॅकर यूजरचे कीस्ट्रोक रेकॉर्ड वापरु शकतो आणि सर्व डेटा मिळवू शकतो. या केबलचे जिओ- फेंसिंग वैशिष्ट्य यूजरच्या डिव्हाइसचे पेलोड ब्लॉक किंवा ट्रिगर करण्यास देखील अनुमती देते.


यावर Apple प्रतिक्रिया


सध्या तरी Appleने यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा विधान दिलेले नाही. अहवालात असे म्हटले आहे की, Appleची सिक्योरिटी या प्रकरणात फारसे काही करू शकणार नाही.