Google Pay, Paytm सारखे UPI वापर असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक झालीच समजा
UPI व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एक चुकी तुमचं मोठं नुकसान करू शकते.
UPI Fraud Alert: अर्थव्यवस्था आणि बँकिंगमध्ये डिजिटल क्रांती झाल्यापासून लोकांमध्ये UPI द्वारे व्यवहार वाढला आहे. UPI व्यवहारामुळे किरकोळ पैशांच्या व्यवहारांसाठी रोख रक्कम ठेवण्याच्या त्रासातून लोकांची सुटका झाली आहे. तसेच सुट्ट्या पैशांसाठी असणार कटकटही संपली आहे. त्याचबरोबर मोठ्या पेमेंटसाठी एटीएम किंवा बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत नाही. 2020-21 या आर्थिक वर्षात जवळपास 5554 कोटी रुपयांचे व्यवहार डिजिटल मार्गाने झाले तर 2021-22 मध्ये हाच आकडा वाढून 7422 कोटी रुपयांवर पोहोचला. डिजिटल व्यवहारात भारताने चीन, दक्षिण कोरिया सारख्या देशांना देखील मागे टाकले आहे. असं असलं तरी UPI व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एक चुकी तुमचं मोठं नुकसान करू शकते. आज आम्ही तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहोत, त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
-तुमचे UPI खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमचा मोबाइल पिन आणि UPI पिन वेगळा ठेवा. यामुळे पिन हॅक होण्याची शक्यता कमी होते.
-तुम्हाला तुमच्या UPI वर एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून पेमेंट रिक्वेस्ट मिळाल्यास, त्याला रिप्लाय देऊ नका. या अज्ञात रिक्वेस्ट स्वीकारल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
-तुम्हाला कोणतीही संशयास्पद UPI विनंती आढळल्यास, त्याची त्वरित तक्रार करा.
-पेमेंट करताना तुम्हाला नेहमी तुमचा UPI पिन आवश्यक आहे. UPI वर पेमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला पिन टाकण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत जर कोणी तुम्हाला पिन मागितला तर देऊ नका.
-तुमच्या UPI वर तुमच्या मंजूरीशिवाय व्यवहार झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, लगेच तुमचा UPI बंद करा. असे केल्याने पुढील नुकसान टाळता येईल. याबाबत तुमच्या बँकेलाही कळवा.