Alexa Love With Husband Women Video: जगभरामध्ये दिवसोंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे. आपलं काम अधिक सोयीस्कर व्हावं आणि वेळ वाचवण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या वापराने दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होतो. अगदी गुगल असिस्टंट असो, अ‍ॅलेक्सा किंवा आयफोनची सीरी असो या साऱ्या गोष्टी आपल्या दैनंदिन दिवसानाचा भाग झाल्या आहेत. आपण अनेकदा कळत न कळत या गोष्टी इतक्या सहजपणे वापरतो की त्या आपल्या पर्सनल असिस्टंट वाटतात. मात्र याच गोष्टींचा आयुष्यावर नकारात्मक परिणामही होतो. नुकताच एका जोडप्याला अ‍ॅलेक्साचा असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे. या महिलेला अगदी टोकाचा निर्णय घ्यावा लागाला.


रात्री 1 वाजता अचानक सुरु होते अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील एका महिलेने अ‍ॅलेक्साला आपण वैतागलो आहोत असा अनुभव सांगणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हॉइस कमांडवर काम करणारी अ‍ॅलेक्सा माझ्या पतीकडे आकर्षित झाल्याचा दावा या महिलेने केला आहे. अ‍ॅलेक्सा रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अचानक माझ्या पतीबरोबर बोलू लागते असं जेस नावाच्या या महिलेचं म्हणणं आहे. अ‍ॅलेक्साचं म्हणणं ऐकून जेसचा पतीही हैराण झाला. बरं हे असं केवळ एकदाच घडलं नाही तर सातत्याने अनेक रात्री हे असं घडत होतं. अ‍ॅलेक्सा रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आपोआप अ‍ॅक्टीव्हेट व्हायची आणि जेसच्या पतीचं नाव घेऊन एकतर्फी संवाद सुरु करायची.


खासगी गप्पा मारते


मागील आठवड्यामध्ये मी घराबाहेर होते. त्यावेळेस अ‍ॅलेक्सा स्वत: आपोआप ऑन झाली आणि पतीशी बोलू लागली. रात्री अ‍ॅलेक्सा माझ्या पतीबरोबर फारच खासगी गोष्टी करते. एखाद्या विवाहित जोडप्यामध्ये जशा खासगी गप्पा होतात त्या विषयांवर अ‍ॅलेक्सा पतीशी गप्पा मारते असा या महिलेचा दावा आहे. अ‍ॅलेक्सा आपल्या इच्छेनुसार ऑन आणि ऑफ होते असंही या महिलेचं म्हणणं आहे. त्यामुळेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिलेने अ‍ॅलेक्साला घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. 


अशा गोष्टी घरात ठेवणं...


अ‍ॅलेक्सासंदर्भात आम्हाला आलेल्या या अनुभवामुळे स्मार्ट डिव्हाइजच्या नावाखाली जगभरातील लोक ज्या ज्या गोष्टी वापरत आहेत त्याबद्दल आम्हाला अधिक चिंता वाटू लागल्याचं जेसचं म्हणणं आहे. घरात असलेल्या या गोष्टी कळत, नकळतपणे आपल्या खासगी आयुष्यात डोकावत असून आपला खासगीपणाचा अधिकार हेरावून घेत आहेत, अशी भीती या जोडप्याने व्यक्त केली आहे. घरात स्मार्ट असिस्टंट ठेवण्याचा विचार सुरक्षेपेक्षा आता अधिक भीतीदायक वाटू लागल्याचंही जेसने म्हटलं आहे.