वॉशिंग्टन : चिनी कंपनी 'टिक टॉक'च्या  (TikTok)अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. भारताने बंदी घातल्यानंतर अमेरिका चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचाही विचार करीत आहे. दरम्यान, अमेझॉनने (Amazon) आपल्या कर्मचार्‍यांना'टिक टॉक' हटवण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्मचार्‍यांना ई-मेलमार्फत सांगण्यात आले आहे की, ज्यावर अमेझॉनकडून ईमेल येत आहेत त्या फोनवरुन  'टिक टॉक'ला   त्वरित काढा. दरम्यान, यावरुन वाद निर्माण झाल्याने अमेझॉनने आपला निर्णय मागे घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेझॉन कंपनीचे म्हणणे आहे की चिनी अॅप सुरक्षेचा धोका आहे, म्हणून ज्या फोनवर अमेझॉनकडून ईमेल येतात त्या फोनवर 'टिक टॉक' वापरु नये. मात्र हा वाद वाढल्यानंतर कंपनीने 'टिक टॉक' हटवण्याबाबतचा ईमेल ही एक चूक असल्याचे म्हटले आहे. अमेझॉनने यापूर्वी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला होता आणि असे म्हटले होते की, शुक्रवारपासून अमेझॉनचा ईमेल वापरुन फोनवरुन 'टिक टॉक' काढून टाकले पाहिजे, कारण यामुळे सुरक्षिततेस धोका आहे. तथापि, कर्मचारी दुसर्‍या फोनवर किंवा अमेझॉन लॅपटॉप ब्राउझरमधून 'टिक टॉक' वापरणे सुरू ठेवू शकता. 


जगभरात ८४०००० पेक्षा जास्त कर्मचारी असून Amazon हे वॉलमार्टनंतर दुसर्‍या क्रमांकाचे खासगी यूएस एम्प्लॉयर आहे. अशा परिस्थितीत जर कंपनी आपला ऑर्डर मागे घेत नसेल तर 'टिक टॉक' खूप मोठा फटका बसू शकतो. 


स्वत:ला अमेझॉनचे कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ही माहिती सामायिक होताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 'टिक टॉक'नेही लगेच प्रतिक्रिया दिली. अमेझॉनने आम्हाला याबद्दल माहिती दिली नाही असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. आम्ही त्यांच्या चिंतेंबाबत समजू शकत नाही, आम्ही लवकरच या संदर्भात अमेझॉन कंपनीशी बोलू. 


त्यानंतर अमेझॉनने स्पष्टीकरण दिले आहे, हा ईमेल एक 'चूक' होती. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार अमेझॉनचे वरिष्ठ अधिकारी या निर्णयाविषयी अनभिज्ञ होते. नंतर, अमेझॉन आणि 'टिक टॉक' अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्या आधारे चिनी अॅप 'टिक टॉक' हटविण्याचा आपला आदेश रद्द केला.


या आठवड्याच्या सुरुवातीस अमेझॉनच्यावतीने कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला गेला. ज्यामध्ये असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की, चिनी अॅप 'टिक टॉक' कंपनीच्या मालकीच्या मोबाइल फोनवरून त्वरित काढून टाकले जावे. कारण ही गोपनीयता आणि सुरक्षिततेची चिंता बनू शकते. कंपनीने दिलेली उपकरणे केवळ कंपनीच्या कामासाठी वापरली जावीत. जर कर्मचार्‍यांना 'टिक टॉक' वापरायचे असेल तर ते ते दुसर्‍या डिव्हाइसवर स्थापित करू शकतात किंवा वापरु शकतात.


अमेरिका-चीन विवाद आणि त्यानंतर भारत-चीन यांच्यात वाढते वाद लक्षात घेता, 'टिक टॉक' स्वत: ला चीनपासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारत-चीन लडाख वादानंतर भारताने ५९ चिनी अॅवर बंदी घातली आहे. यात 'टिक टॉक'चा समावेश आहे.