मुंबई : अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फ्रिडम फेस्टीवल सेल (Amazon Great Freedom Festival Sale) आजपासून म्हणजेच 6 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. हा सेल 10 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली सुवर्णसंधी आहे. जर तुमचे बजेट कमी असतील तर तुमच्यासाठी अशाच पाच उत्कृष्ट स्मार्टफोन डील्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OnePlus Nord CE 2 Lite 5G: 
OnePlus कडून 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा 5G फोन 19,999 रुपयांऐवजी 18,999 रुपयांना विकला जात आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 1 हजाराची बचत केली जाऊ शकते. तर एक्सचेंज ऑफरमधून 12,750 रुपयांची सूट मिळू शकते. 


Samsung Galaxy M33 5G: 
24,999 रुपयांचा हा Samsung 5G स्मार्टफोन 18,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही 6GB रॅम, 128GB स्टोरेज आणि 6000mAh बॅटरीसह हा फोन खरेदी करण्यासाठी SBI चे क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्ही 3 हजार रुपये वाचवू शकता आणि एक्सचेंज ऑफरमधून 12,750 रुपयांची सूट मिळवू शकता. 


Redmi Note 11 Pro + 5G:
Redmi Note चा हा 5G स्मार्टफोन 6GB रॅम, 128GB स्टोरेज आणि 67W टर्बो चार्ज सपोर्टसह 18,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 24,999 रुपये आहे. SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एक हजार रुपयांची सवलत मिळेल. एक्सचेंज ऑफरमधून जुन्या फोनच्या बदल्यात तो विकत घेतल्यास, 14,750 रुपयांची बचत करता येईल. 


iQOO Z6 5G: 
20,990 रुपयांचा हा 5G स्मार्टफोन 16,999 रुपयांना विकत घेता येईल. बँकेच्या ऑफरद्वारे एक हजार रुपये, कूपन डिस्काउंटद्वारे एक हजार रुपये वाचतील. एक्सचेंज ऑफरच्या मदतीने 12,750 रुपये वाचवले जाऊ शकतात. 


Oppo A74 5G:
Oppo च्या या 5G स्मार्टफोनची किंमत 20,990 रुपये आहे पण Amazon सेलमध्ये तो 14,990 रुपयांना विकला जात आहे. एसबीआय कार्ड वापरून 750 रुपये आणि एक्सचेंज ऑफरसह 12,750 रुपये वाचवले जाऊ शकतात. 


दरम्यान मोबाईल खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेत तुम्हाला कमी पैशांमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.