Spy Camera : अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे  (Hidden Camera) बघितलेच असतील. असे छुपे कॅमेरे पेन, पर्स, शर्ट अशा ठिकाणी लावलेले असतात. त्यामुळे अशा कॅमेऱ्यांना ओळखणे कठीण जाते. मात्र, आता स्मार्टफोन व त्याच्याशी संबंधित इतर वस्तूंचा आपण नियमित वापर करत असतो. त्यामध्ये संबंधित प्रोडक्टमध्ये छुपा कॅमेरा लावलेला असल्याचे निर्देशनात आले आहे. बाजारात असे अनेक मोबाइल चार्जर उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्पाय कॅमेरा लावलेला आहे. विशेष म्हणजे या चार्जरमध्ये कॅमेरा लावलेला आहे की नाही हे देखील लक्षात येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे आहेत कॅमेराचे वैशिष्ट्ये


 ई-कॉमर्स साइट Amazon वर AUSHA चा स्पाय कॅमेऱ्यासह येणारा फोन चार्जर उपलब्ध आहे. यात पोर्टेबल होम सिक्योरिटी कॅमेरा मिळतो. जो नाइट व्हिजन आणि मोशन सेंसरसह येतो. प्रोडक्ट डिस्क्रिप्शननुसार, चार्जरमध्ये दिलेला कॅमेरा डिव्हाइसला प्लग-इन करताच सुरू होतो. या चार्जरला ३२ जीबी मेमरी कार्ड टाकून चार्जिंगला लावावे लागेल. यानंतर हे काम करणे सुरू करेल. या चार्जरच्या मदतीने तुम्ही फोन व इतर डिव्हाइसला देखील चार्ज करू शकता. कंपनीनुसार, डिव्हाइसच्या मदतीने १०८०पी मध्ये रेकॉर्डिंग करता येईल. या कॅमेऱ्यामध्ये मोशन डिटेक्शन आणि लूप रेकॉर्डिंगचे फीचर देखील मिळते. बाजारात अशाप्रकारचे अनेक शानदार प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर तुम्ही सिक्योरिटी कॅमेऱ्याप्रमाणे करू शकता.