Amazon कडून युजर्सना फुकटात मिळतंय `या` App चं प्रिमीयम सब्सक्रिप्शन; वाट कसली बघताय?
भारीये हे.... तुम्हीही (Amazon app) अॅमेझॉनवरून काही खरेदी करताय का? आधी ही ऑफर पाहा. फुकट ते उत्तम असं म्हणत अनुभव घ्या या धमाकेदार App चा
Amazon App : Amazon हे एक असं अॅप आहे जे जवळपास दर दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतं. लहानातल्या लहान वस्तूपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी किंवा उपकरणापर्यंत बऱ्याच गोष्टी या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात (Shopping on amazon). इतकंच काय, तर अॅपच्या मदतीनं तुम्ही पैसे, बिलं या साऱ्यांची देवाणघेवाणही करु शकता. (Amazon Gift voucher) भेटवस्तू पाठवू शकता. अशा या बहुविध वापराच्या App कडून एक धमाकेदार ऑफर तुमच्या भेटीला आली आहे.
सहा महिने फुकटात वापरा ही ऑफर
सहा महिन्यांसाठी आता अॅमेझॉन तुम्हाला स्पॉटीफाय Spotify चं प्रिमियम सब्सक्रिप्शन (Premium Subscription) अगदी मोफत मिळवून देणार आहे. ही ऑफर निवडक खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला इतकंच करायचं, की Amazon सुरु करून यासाठी स्वत:ला पात्र ठरवाचं आहे.
वाचा : WhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त
अॅमेझॉनकडून यासंदर्भातील माहिती त्यांच्या सपोर्ट पेजवर देण्यात आली आहे. जिथं ज्या युजर्सचा ई-मेल आयडी (email id) अॅमेझॉन इंडियाकडे registered आहे त्यांच्यासाठीच ही ऑफर असेल.
Spotify Premium offer आहे तरी काय?
ऑफरच्या उपलब्ध माहितीनुसार जे युजर्स laptops, tablets, mobile devices आणि इतर उपकरणं जसंकी headphones आणि speakers ज्यांची किंमत 1 हजारहून जास्त आणि 5 हजार किंवा त्याहून कमी असेल तर त्यांच्यासाठी स्पॉटीफायचं 3 महिन्यांचं प्रिमियम सब्सक्रिप्शन असेल. थोडक्यात तुम्हाला 6 नाहीतर 3 महिन्यांचं सब्सक्रिप्शन मिळेलच.
कधीपर्यंत आहे ही ऑफर? (Validity of offer)
अॅमेझॉनकडून देण्यात आलेल्या या धमाकेदार ऑफरची अंतिम तारीख आहे 24 नोब्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022. जे या ऑफरसाठी पात्र ठरतील त्यांच्या रजिस्टर्ड ईमेलवर त्यासंबंधीचं voucher येणार आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत हे voucher येईल असं टीम अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे.