जुन्या SUV गाडीची झटपट विक्री झाल्याने आनंद महिंद्रा आश्चर्यचकीत, म्हणाले...
सप्टेंबर महिन्यात कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात महिंद्राच्या गाड्यांना लोकांनी चांगलीच पसंती दिली. महिंद्रा ही सप्टेंबर 2022 मध्ये सर्वात जास्त SUV विक्री करणारी कार कंपनी ठरली आहे.
Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यात कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात महिंद्राच्या गाड्यांना लोकांनी चांगलीच पसंती दिली. महिंद्रा ही सप्टेंबर 2022 मध्ये सर्वात जास्त SUV विक्री करणारी कार कंपनी ठरली आहे. Mahindra Scorpio-N आणि Mahindra XUV700 सारख्या वाहनांना जोरदार मागणी होती. मात्र, गेल्या महिन्यात कंपनीच्या स्कॉर्पिओ क्लासिकचे सर्वाधिक बुकिंग झाले आहे. महिंद्राने गेल्या महिन्यातच आपली स्कॉर्पिओ कार एका नवीन अवतारात सादर केली आहे. कंपनीने नवीन वाहनाला महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक असे नाव दिले आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे (Scorpio Classic) बुकिंग पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. ट्विटरवर एक जुना फोटो शेअर करताना त्यांनी आठवण सांगितली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्याने 2002 मधील पहिल्या स्कॉर्पिओ लाँचचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, "सप्टेंबर चांगला होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात सर्वाधिक बुकिंग स्कॉर्पिओ क्लासिकसाठी होते. 2002 मध्ये पहिल्या स्कॉर्पिओच्या लाँचिंगच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुने ते खरंच सोने असतं."
स्कॉर्पिओ क्लासिक इंजिन
स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लिटर सेकंड जनरेशन mHawk डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 132 PS ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत रु.11.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.